सावळीविहीर भरवस फाटा या राज्य मार्ग क्रमांक ७ च्या पुढे नाशिक जिल्हा सरहद्दीला जोडणारा मार्ग असल्याने या मार्गावर रहदारी मोठ्या प्रमाणात चालते. कोळपेवाडी परिसरातील गौतम पब्लिक स्कूलच्या पाठीमागे यू-टर्नवर नेहमीच अपघात होत असतात. यू-टर्न जागीच असल्याने समोरून येणारे वाहन चालकांना दिसत नाही. त्यामुळे वाहने समोरासमोर येऊन अपघात घडत असतात. अनेकांना कायमचे अपंगत्व, तर अनेकांचा याठिकाणी बळी गेलेला आहे. साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरू असल्याने वाहतुकीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. निवेदनावर अध्यक्ष रमेश भोंगळ, उपाध्यक्ष भाऊसाहेब वाघडकर, रावसाहेव मोरे, वाल्मीक जाधव, सोमनाथ गोर्ड, भाऊसाहेब धुंदे यांच्या सह्या आहेत.
कोळपेवाडी - शहा रस्त्यावर गतिरोधक बसवा
By | Updated: December 5, 2020 04:35 IST