शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

जलजीवनच्या कामांची खातेप्रमुखांकडून तपासणी, नगर जिल्ह्यात ९०० गावांत कामे प्रगतिपथावर

By चंद्रकांत शेळके | Updated: June 26, 2023 20:28 IST

अधिकाऱ्यांसोबत एक उपअभियंता

अहमदनगर : जिल्ह्यात सुरू असलेल्या जलजीवन मिशनच्या कामांबाबत तक्रारी झाल्याने या कामांची तपासणी करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या खातेप्रमुखांची नेमणूक करण्यात आली. दोन दिवस तपासणी केल्यानंतर सोमवारी या खातेप्रमुखांनी मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्याकडे अहवाल सादर केला.

जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत सन २०२४ पर्यंत ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला नळाने पाणी देण्याचा केंद्र व राज्य शासनाचा मानस आहे. त्यासाठी जलजीवन मिशनअंतर्गत राज्यातील अनेक गावांत पाणी योजनांची कामे सुरू आहेत. नगर जिल्ह्यात पाणीपुरवठा विभागाकडून ८५० कोटी रुपये खर्चाच्या पाणी योजनांची कामे ९०० गावांमध्ये केली जात आहेत. गेल्या दोन वर्षांपासून ही मोहीम सुरू असली तरी यातील बहुतांश कामे गेल्या वर्षभरात मंजुरी मिळून सुरू झालेली आहेत. सध्या सर्व कामांच्या निविदा प्रक्रिया होऊन कामे सुरू आहेत. परंतु या कामांबाबत अनेक तक्रारी सध्या जिल्हा परिषदेकडे येत आहेत. निविदा प्रक्रियेतील अनियमिततेसह सुरू असलेल्या कामांचा दर्जा निकृष्ट असल्याच्या या तक्रारी आहेत. दरम्यान, मध्यंतरी अशाच तक्रारीमुळे राज्य सरकारच्या जलजीवन मिशन कार्यक्रमाच्या संचालनालयाने या कामांची तपासणी करून अहवाल सादर करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिला होता.

दरम्यान, कामांच्या निविदा प्रक्रिया योग्य पद्धतीने झाल्या आहेत. परंतु प्रत्यक्ष कामात काही त्रुटी राहू नयेत किंवा गावांतील लोकांची योजनेबद्दलची मते जाणून घेण्यासाठी ही तपासणी करण्यात येत असल्याचे सीईओंचे मत आहे. त्यासाठी प्रत्येक तालुक्यातील काही कामांना भेटी देऊन तेथील तपासणी करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या विविध विभागप्रमुखांची नेमणूक करण्याचा निर्णय सीईओ येरेकर यांनी घेतला. त्यानुसार या विभागप्रमुखांनी शनिवार (दि. २४) व रविवार (दि. २५) असे दोन दिवस कामांची पाहणी केली. त्याचा अहवाल दि. २६ रोजी येरेकर यांना विभागप्रमुखांनी सादर केला. आता या अहवालात नेमके काय आढळले, हे गुलदस्त्यात आहे. कामांचा दर्जा खरंच निकृष्ट आहे की केवळ राजकीय श्रेयवादातून या तक्रारी झाल्या आहेत, या बाबी आता अहवालातूनच समोर येणार आहेत.अधिकाऱ्यांसोबत एक उपअभियंताजिल्ह्यातील १४ तालुक्यांसाठी जिल्हा परिषदेचे १४ विभागप्रमुख विविध तालुक्यांत या कामांची तपासणी करण्यासाठी गेले. बांधकामासह पाईप व इतर साहित्याच्या दर्जा, पाणी योजनेचे स्त्रोत ही पाहणी करण्यासह गावातील लोकांची मते अधिकाऱ्यांनी जाणून घेतली. दरम्यान, यातील काही बाबी तांत्रिक असल्याने त्याबाबतची माहिती देण्यासाठी या अधिकाऱ्यांसोबत पाणीपुरवठा विभागातील एकेका उपअभियंत्याची नेमणूक करण्यात आली होती.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर