अहमदनगर : केंद्रीय आरोग्य विभागाच्या पथकाने शुक्रवारी शहरातील कोविड केअर सेंटरसह लसीकरण केंद्रांना भेटी देऊन पाहणी केली. सायंकाळी उशिरापर्यंत पथकाकडून महापालिकेने केलेल्या उपाययोजनांची पाहणी करत सूचना केल्या.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या उपाययोजनांची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक नगरमध्ये दाखल झाले आहे. दोन सदस्यांचे हे पथक आहे. या पथकाने महापालिकेच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन बुथ हॉस्पिटल, केडगाव येथील कोविड केअर सेंटर, नटराज कोविड सेंटरला भेट दिली. रुग्णांना दिल्या जाणाऱ्या सुविधांसह उपचारांची पथकाने माहिती घेत काही सूचनाही केल्या. महापालिकेच्या सात प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोनावरील लस दिली जात आहे. या केंद्रांनाही पथकाने भेटी दिल्या, तसेच उपाययोजनांचा आढावा घेतला. हे पथक जिल्ह्यातील कोविड सेंटरलाही भेटी देणार असून, आढावा घेणार आहे. केंद्रीय पथक शहरात दाखल झाल्याने महापालिका अधिकाऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली. मनपाचे अधिकारीही दिवसभर पथकासोबत होते.
....
सूचना फोटो आहे .