संगमनेर तालुका युवक काँग्रेसच्या वतीने विविध पेट्रोल पंपावरती पंतप्रधान मोदी यांचे महागाई विरोधात बोलू नका, ऐकू नका व पाहू नका असे फ्लेक्स लावण्यात आले आहेत. यावेळी केंद्र सरकारच्या धोरणाविरुद्ध जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. पंचायत समितीचे उपसभापती नवनाथ आरगडे, युवक काँग्रेसचे उत्तर नगर जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष सांगळे, संगमनेर तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष आनंद वर्पे, शहराध्यक्ष निखिल पापडेजा, अकोले तालुका युवक अध्यक्ष अमोल नायकवाडी, विजय उदावंत, तुषार वनवे, हर्षल राहणे, अमित गुंजाळ, निखिल पवार, अक्षय दिघे, साहिल इनामदार, दत्ता वाकचौरे, ऋतिक राऊत, मनीष राक्षे, शुभम पेंडभाजे, अनिकेत आंब्रे, गौरव जाधव, मोहन पठाडे, प्रदीप नाईकवाडी, सुमित पानसरे, बाळासाहेब कुहार्डे, नवनाथ कुरकुटे, बाळासाहेब कुरकुटे, सयाजी कुरकुटे, प्रमोद कुरकुटे, चेतन कजबे, बाजीराव शेरमळे, निखिल कुरकुटे आदी उपस्थित होते.
पेट्रोल डिझेल दरवाढ विरोधात युवक काँग्रेसचे अभिनव आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:38 IST