शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

मिरची-मसाल्यांना महागाईचा ठसका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:19 IST

अहमदनगर : उन्हाळा सुरू झाला की, घरोघरी महिलांची मसाला तयार करण्याची लगबग सुरू झाली आहे. मार्च ते एप्रिल या ...

अहमदनगर : उन्हाळा सुरू झाला की, घरोघरी महिलांची मसाला तयार करण्याची लगबग सुरू झाली आहे. मार्च ते एप्रिल या दोन-तीन महिन्यांत वर्षभरासाठी मसाला तयार केला जातो. मसाल्याच्या पदार्थांना मागणी वाढल्याने दरही वाढले आहेत. त्यात लाल मिरचीचे दरही किलोमागे १० ते २० रुपयांनी वाढले आहे. इंधनाचे दर वाढत असल्यामुळे वाहतुकीचा खर्चही वाढत आहे. यामुळे यंदा बेडगी, तेजा मिरची, खोबरे, धने यासारखे जिन्नस महागले असल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले आहे.

मार्च ते मे महिन्यात उन्हाचा तडाखा जास्त असल्याने या काळात तिखट, मसाला बनविण्यासाठी उत्तम मानला जातो. त्यामुळे मार्च ते मे या तीन महिन्यांत मोठ्या प्रमाणावर गृहिणी मिरची, तसेच धने, जिरे, खसखस, खोबर, मेथी, हळद, लवंग खरेदीसाठी बाजारात गर्दी करतात. त्यामुळे उन्हाच्या तोंडावर मिरची व मसाल्यांच्या दरात वाढ होते. बाजारात सध्या बेडगी, तेजा या मिरचीस मागणी आहे. बेडगी मिरची ३६० रुपये किलोने विकली जात आहे. लॉकडाऊनपासून मिरचीचा दर वाढत आहेत, तर बेडगीच्या दरातही १० ते १५ टक्क्यांनी वाढ झाली. धने, खोबर, जिरे, तिळाचे दरही फेब्रुवारी महिन्यापासून वाढल्याचे मसाला व्यावसायिकांनी सांगितले.

-----------------

मिरचीचे दर प्रति किलो

लवंगी- २३० गंटूर-२२०

काश्मिरी- ४३०

-------------------

मसाल्यामधील पदार्थ्यांचे दर (रुपये प्रति ५० ग्रम)

दालचिनी- ५०

शहाजिरे- ५०

लवंग- ७०

मिरे- ५०

मसाला विलायची- ८०

मायपत्री- ९०

जायपत्री- १७०

कर्णफूल- ९५

नाकेश्वर- १६०

त्रिफळा- ५०

कपूरचिनी- १३०

दगडफूल- ५०

तमालपत्र- १५

खसखस- ८५

--------------------

अन्य पदार्थ (प्रति किलो दर)

धने- १००

तीळ- १६०

खोबरे- २२०

मेथी- १४०

हळद- १६०

---------

मिरची येते आंध्रातून

गुंटूर मिरची आंध्र प्रदेश राज्यातून येते. तेजा मिरची स्थानिक, तसेच राज्यातील विविध भागांतून विक्रीस येत असते. ही मिरची अधिक तिखट असल्याने मिरचीला मागणी आहे.

बेडगी मिरची कर्नाटक, हवेरी येथून बाजारात येते. बेडगी मिरचीतही लाल व चॉकलेटी असा प्रकार आहे. अधिक नागरिक बेडगी मिरची तिखटपणाऐवजी खाद्यपदार्थांच्या रंगासाठी वापरत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

सध्या गुंटूर मिरचीस भाव नसल्याने या मिरचीचा दर उतरला आहे, तर खोबर हे कोकणातून बाजारात दाखल होत आहे. खोबऱ्याच्या दरातही वाढ झाली आहे.

--------------------

गृहिणी म्हणतात...

मार्च महिन्यापासून उन्हाळी कामे सुरू केली जातात. एप्रिल महिन्यात चटणी, लोणचे, पापड बनविण्यासाठी मिरची, मसाल्यांची खरेदी करावी लागत आहे. मात्र, आता खाद्यतेलापाठोपाठ मिरचीही महागली आहे, शिवाय मसाल्याच्या दरातही वाढ झाली आहे. वाढत्या महागाईमुळे कसरत करावी लागत आहे.

----------------------

वर्षभरासाठी लालतिखट, काळे तिखट बनविले जाते, शिवाय लोणचेही करून ठेवण्यात येते. त्यासाठी लाल मिरची, मसाला खरेदी करायचा आहे. मात्र, बाजारात मागील महिन्यापासून मिरची व मसाल्याच्या दरामध्ये वाढ होत आहे.

-------------

डमी- नेटफोटो

१९ मसाला रेट-लोकमत डमी

२० चिली