शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

एसटी संपाचा पारनेरमधील उद्योगास दोन कोटींचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2017 17:06 IST

फटाका विक्री व्यवसायात सुमारे पन्नास ते साठ युवक यंदा उतरले होते. सर्वाधिक फटका त्यांना संपाचा बसला आहे. संपामुळे बाहेरील शेजारील गावांमधील सामान्य लोक पारनेर शहरात आलेच नाही. त्यामुळे फटाका विक्री करणा-या दुकानांमध्ये शुकशुकाटच दिसत होता. 

पारनेर : राज्यभरात सुरू असलेल्या एस़टीक़ामगारांच्या संपाचा परिणाम पारनेर शहरातील उद्योगांवरही झाला असून सुमारे दोन कोटींच्या अर्थकारणाचा फटका व्यावसायिकांना बसला आहे.गेल्या तीन दिवसांपासून एस़टी़चा संप सुरू आहे. पारनेर आगारातील कर्मचारीही यात उत्स्फूर्तपणे सहभागी झाले असल्याने एकही एस. टी. आगाराच्या बाहेर आली नाही. एस. टी. बंद असल्याने त्याचा फटका पारनेर शहरातील सर्वच छोट्या - मोठ्या व्यावसायिकांवर झालेला गुरूवारी बाजारात फेरफटका मारल्यानंतर दिसून आला. फटाका विक्री व्यवसायात सुमारे पन्नास ते साठ युवक यंदा उतरले होते. सर्वाधिक फटका त्यांना संपाचा बसला आहे. संपामुळे बाहेरील शेजारील गावांमधील सामान्य लोक पारनेर शहरात आलेच नाही. त्यामुळे फटाका विक्री करणा-या दुकानांमध्ये शुकशुकाटच दिसत होता. सुमारे वीस ते पंचवीस लाख रूपयांचा फटका या व्यावसायिकांना बसला आहे. पारनेर बसस्थानकाशेजारील विविध प्रकारची दुकाने नेहमी दिवाळीच्या काळात गजबजलेली असतात. यंदा तिकडेही शांतताच होती. पारनेर शहराची नवी पेठ, मुख्य शिवाजी पेठ परिसरांतही शुकशुकाट होता. अनेक छोटे-मोठे व्यावसायिक धरून सुमारे दीड ते दोन कोटींच्या अर्थकारणाचा फटका बसला.

बसस्थानकाकडे प्रवासी फिरकलेच नाहीत

एस. टी. संपाच्या पार्श्वभूमीवर तहसीलदार भारती सागरे, गटशिक्षणाधिकारी जयश्री कार्ले, पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे, आगारप्रमुख पराग भोपळे, विभागीय अधिकारी अनिता कोकाटे, सतिष कांबळे, तहसील कार्यालयाचे सचिन शिंदे यांनी प्रवाशांसाठी दोन बसेसचे नियोजन गुरूवारी सकाळपासून केले होते. मात्र एस. टी. संपामुळे बसस्थानकाकडे प्रवासी फिरकलेच नसल्याचे चित्र दिसून आले. तर पारनेर-सुपा, पारनेर-कान्हुर, पारनेर-देवीभोयरे या मार्गावर खासगी प्रवासी वाहतुकीचा आधार प्रवाशांना मिळत होता असे चित्र दिसून आले.

सरकारच्या विरोधात कामगारांचे मुंडन

आम्ही दहा महिन्यांपासून आमच्या मागण्या मांडत असूनही सरकारने त्याकडे दुर्लक्ष केल्याने ऐन दिवाळीत सामान्य प्रवाशांना सरकारमुळेच हाल सोसावे लागत आहेत, असे कर्मचारी म्हणाले. सरकारने अद्यापही मागण्यांवर तोडगा काढला नाही म्हणून सरकारच्या विरोधात पारनेर एस. टी. आगारातील अनेक कर्मचा-यांनी सामूहिक मुंडन केले. यावेळी कामगार एकजुटीचा विजय असो अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. यावेळी पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणावर ठेवण्यात आला होता.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरST Strikeएसटी संप