संस्थापक व दूध उत्पादकांचे नेते कै. नामदेवराव परजणे पाटील (आण्णा) यांच्या १७ व्या पुण्यस्मरण सोहळ्यानिमित्त रविवार दि. २० जून २०२१ रोजी प्रसिद्ध कीर्तनकार व समाज प्रबोधनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर) यांच्या प्रवचनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असल्याची माहिती संघाचे अध्यक्ष राजेश परजणे पाटील यांनी दिली.
पुण्यस्मरण सोहळ्यानिमित्त रविवारी सकाळी १० वाजता संवत्सर येथील महानुभाव आश्रमासमोरील परिसरात वृक्षारोपण, तर सकाळी १०.३० वाजता जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील डिजिटल सॉफ्टवेअर सिस्टिमचा तसेच नवीन शाळा खोल्या बांधकामाचा शुभारंभ करण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी २ ते ४ या वेळेत कीर्तनकार व प्रबोधनकार ह. भ. प.
निवृत्ती महाराज देशमुख ( इंदुरीकर) यांचा प्रवचनाचा कार्यक्रम नामदेवराव परजणे पाटील महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेला आहे.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर हा पुण्यस्मरण सोहळा मर्यादित स्वरूपात आणि शासनाने घालवून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून पार पाडण्यात येणार आहेत. उपरोक्त कार्यक्रम यू ट्यूब, फेसबुक तसेच गुगल मीटद्वारे ऑनलाईन प्रसारित केला जाणार असल्याची माहितीही संघाचे अध्यक्ष राजेश परजणे पाटील यांनी दिली.