शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अनाथ, निराधार २५० विद्यार्थ्यांना स्वखर्चातून शिक्षण :  इंदोरीकर महाराजांचा उपक्रम 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2019 15:31 IST

ओझर खुर्द (ता.संगमनेर) येथे ज्ञानेश्वर माऊली सेवाभावी संस्था सुरू केली. सुरूवातीला शंभर अनाथ, निराधार मुलांना शिक्षणासाठी दत्तक घेतले.

योगेश रातडियाआश्वी : ओझर खुर्द (ता.संगमनेर) येथे ज्ञानेश्वर माऊली सेवाभावी संस्था सुरू केली. सुरूवातीला शंभर अनाथ, निराधार मुलांना शिक्षणासाठी दत्तक घेतले. आता या केंद्रात २५० मुले शिक्षण व अध्यात्माचे धडे घेत आहेत. समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) आपल्या कीर्तनाच्या मानधनातून व स्वर्चातून या मुलांना शिक्षणाचे धडे देत आहेत.वर्षानुवर्षे चालत आलेल्या समाजातील प्रथा, कर्मकांड, दैनंदिन जीवनातील घडामोडींवर आपल्या विनोदी शैलीतून ताशेरे ओढत समाजप्रबोधन करणारे इंदोरीकर महाराज सर्वांना परिचत आहेत. पण सध्या काही तथाकथीत लोकांकडून इंदोरीकर महाराज हे अवाजावी मानधन घेत असल्याची चर्चाही केली जाते. दुसरीकडे स्वत: निवृत्ती महाराज हे जाहीर कीर्तनातून आपण लोकांना खसकविण्याचे पैसे घेत असल्याचे सांगत असतात. मात्र या मानधनातून मिळणाऱ्या पैशाचा विनयोग ते सेवा भावनेतून करताना दिसत आहेत. समाजातील अनाथ व निराधार मुलांसह शिक्षणापासून वंचित असलेल्या मुलांमुलींसाठी मोफत शाळा चालविण्यासाठी ते खर्च करीत आहेत. अध्यात्मिक व संस्कारक्षम शिक्षण देऊन सुसंस्कृत समाज निर्मिती करण्याचे कामही इंदोरीकर करीत आहेत.शिक्षणाचे बाजारीकरण झालेल्या समाजात स्वखर्चातून ओझर खुर्द (ता. संगमनेर) येथे ज्ञानेश्वर माऊली सेवाभावी संस्था स्थापन केली. अनाथ निराधार मुलांना महाराजांनी दत्तक घेतले आहे. या शाळेत मुलांची राहण्याची उत्तम व्यवस्था, मनोरंजनासाठी टिव्ही, सकाळी चहा, नाष्टा तसेच दोन वेळा जेवण दिले जाते. या सर्व विद्यार्थ्यांचा वह्या, पुस्तकांसह कपड्यांचा खर्च इंदोरीकर महाराज स्वत: करतात.ज्ञानेश्वर माऊली सेवाभावी संस्थाज्ञानेश्वर माऊली बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या अंतर्गत विनाअनुदानित खंडेराव पाटील खेमनर माध्यमिक विद्यालय ओझर बुद्रूक (ता. संगमनेर) येथे सुरू केले आहे. या विद्यालयात इयत्ता पाचवी ते दहावीच्या २५० मुलामुलींना कुठलीही प्रवेश फी, परीक्षा फी ते घेत नाहीत. शिवाय या विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तके मोफत दिली जातात.विना अनुदानित असलेल्या या शाळेच्या शिक्षकांच्या पगारापासून विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचा सर्व खर्च निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) स्वत: करतात. शिवाय स्वत: ते बी.एस्सी., बी.एड.असल्याने विद्यार्थ्यांना ते वेळोवेळी मार्गदर्शन करीत असतात. -आण्णासाहेब केसकर, प्राचार्य

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAkoleअकोले