अकोले : समाजप्रबोधनकर निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांनी संगमनेर तालुक्यातील ओझर, रहिमपूर, कोकणगाव, वडगापान येथील काही गरीब कुटुंबाना धान्य वाटप करण्यास सुरुवात केली आहे. गेल्या दोन दिवसापासून ते या उपक्रमात स्वत: सहभागी होत आहेत. देशासह राज्यात कोरोनाने देश संकटात सापडला आहे. यामुळे अनेकांचा रोजगार बुडाला आहे. अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. या पार्श्वभूमीवर इंदोरीकर महाराजांनी सामाजिक बांधिलकीतून मदतीचा हात पुढे केला आहे. दोन दिवसापूर्वी त्यांनी संगमनेर तालुका सहाय्यता निधीला एक लाखांचा धनादेश तहसीलदारांकडे सुपूर्द केला होता. दरम्यान, इंदोरीकर महाराजांनी यावरच न थांबता आणखी मदतीचा हात पुढे केला आहे. कोरोनाच्या संकटामुळे अनेक घटकांवर उपासमारीची वेळ आली. ही बाब लक्षात घेऊन इंदोरीकर यांनी संगमनेर तालुक्यातील ओझर, रहिमपूर, कोकणगाव, वडगापान येथील काही गरीब कुटुंबाना धान्याचे वाटप करण्यास सुरुवात केली आहे. यावेळी त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
इंदोरीकर महाराज धावले मदतीला..गरीब कुटुंबांना केले धान्यवाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2020 10:53 IST