शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

मानसिक आरोग्याबाबत भारत आजही अंधारयुगात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:16 IST

महात्मा गांधी आणि कस्तुरबा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्ताने स्नेहालय परिवाराच्या वतीने ‘बा आणि बापू’ हा पुरस्कार प्रदान उपक्रम ...

महात्मा गांधी आणि कस्तुरबा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्ताने स्नेहालय परिवाराच्या वतीने ‘बा आणि बापू’ हा पुरस्कार प्रदान उपक्रम सुरू केला आहे. पहिल्याच बापू पुरस्काराने मानसोपचारतज्ज्ञ डॉ. वटवानी आणि बा पुरस्काराने बुलढाणा येथील सेवासंकल्प संस्थेच्या संचालिका आरती नंदू पालवे यांना सन्मानित करण्यात आले. केडगाव येथील सौ. रूपाली मुनोत, बालकल्याण संकुलात २४ डिसेंबर रोजी हा कार्यक्रम झाला. यावेळी वटवानी बोलत होते.

यावेळी पद्मश्री पोपटराव पवार, नीळकंठ आव्हाड, ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक महावीर जोंधळे, कामोद खराडे आणि इंदुमती जोंधळे यांच्या हस्ते मान्यवरांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी मानसोपचारतज्ज्ञ डॉ. नीरज करंदीकर यांनी डॉ.वटवानी यांची तर समुपदेशक दीपा निलेगावकर यांनी आरती पालवे यांची मुलाखत घेतली.

डॉ. वटवानी यांनी कर्जत (जि. रायगड) येथे श्रद्धा रिहॅबिलिटेशन फाऊंडेशनची स्थापन करून दहा हजारांवर अधिक मानसिक आजारी रुग्णांना संपूर्ण बरे केले. या कार्यासाठी डॉ. वटवानी यांना जगातील प्रतिष्ठेचा रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळाला आहे.

चिखली (जि. बुलढाणा ) येथे मानसिक आजारी रुग्णांची सेवा-सुश्रूषा आणि कौटुंबिक पुनर्वसन आरती आणि नंदू पालवे या दांपत्याने कुठलीही संसाधने आणि पाठबळ नसताना केली. अहमदनगर शहर आणि पंचक्रोशीत बेवारस मनोरुग्ण मुक्त करण्यासाठी सर्व मानसोपचारतज्ज्ञ, इतर डॉक्टर, संस्था आणि संवेदनशील नागरिकांनी एकत्रित काम करावे, असे आवाहन वटवानी व पालवे यांनी केले. यावेळी जोंधळे यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन डॉ. दया भोर यांनी सूत्रसंचालन केले. राजीव कुमार यांनी आभार मानले.

फोटो २६ पुरस्कार

ओळी- स्नेहालय परिवाराच्या वतीने डॉ. भरत वटवानी यांना पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते बापू हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.