कोपरगाव : तालुक्यातील कोकमठाण येथील समता इंटरनॅशनल स्कूल येथे ७५ वा अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन सुधा कैलास ठोळे यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करत उत्साहात संपन्न झाला.
समता इंटरनॅशनल स्कूलचे अध्यक्ष काका कोयटे, कोपरगाव नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा सुहासिनी कोयटे, फॅशन डिझायनर सिमरन खुबानी, मॅनेजिंग ट्रस्टी स्वाती कोयटे, मुख्य कार्यवाहक संदीप कोयटे, व्यवस्थापन समितीचे सदस्य गुलाबचंद अग्रवाल, जितू शहा, गुलशन होडे, भरत अजमेरे, निरव रावलिया, कचरू मोकळ, शोभा दरक यांची प्रमुख उपस्थिती होती.
अन्वी उंबरकर हिने १५ ऑगस्ट १९४७ रोजी तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या भाषणातील विचार स्वतःच्या भाषणातून व्यक्त करत उपस्थितांची मने जिंकली. तर स्कूलच्या इतर विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतावर समूह नृत्य सादर केली. समता टायनी टॉट्स मधील शौर्य शर्मा यानेही स्वातंत्र्याविषयी भाषणातून विचार व्यक्त केले.