शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पाऊस लांबल्याने टँकर संख्येत वाढ, नगर जिल्ह्यात १६ टँकर

By चंद्रकांत शेळके | Updated: June 12, 2023 17:29 IST

सध्या २७ गावे व १२० वाडीवस्त्यांवरील ४८ हजार ९६७ ग्रामस्थांची तहान टँकरच्या पाण्याने भागत आहे.

अहमदनगर : पाऊस लांबल्याने जिल्ह्यात दिवसेंदिवस टँकरची संख्याही वाढत आहे. सध्या जिल्ह्यातील २७ गावे व १२० वाडी-वस्तीवरील ४८ हजार ९६७ लोकांना टँकरने पाणीपुरठा केला जात आहे. पाऊस वेळेत न पडल्यास या महिन्यात टँकरच्या संख्येत आणखी वाढ होऊ शकते.

मागील वर्षी चांगला पाऊस पडल्याने उन्हाळ्यात टंचाईजन्य स्थिती झाली नाही. परिणामी पाण्याच्या टँकरची संख्याही मर्यादित राहिली. जूनमध्ये पाऊस पडल्यास पाण्याची अडचण येत नाही. परंतु यंदा अर्धा जून महिना लोटला तरी पावसाची चिन्हे दिसेनाशी झाली आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील ५० हजार लोकसंख्या थेट टँकरवर आली. तेथे पाणीच नसल्याने टँकर सुरू करावे लागते आहेत.

यंदाच्या उन्हाळ्यात एप्रिलपर्यंत एकही टँकर जिल्ह्यात सुरू नव्हता. थेट १८ एप्रिलला संगमनेर व अकोले तालुक्यात एकेक टँकर सुरू झाला. त्यानंतर मे व आता जून महिन्यात हळूहळू टँकरची संख्या वाढून ती सद्यस्थितीत १६ पर्यंत केली आहे. जूनमध्ये पाऊस पडल्यानंतर टँकरची संख्या आपोआप कमी होते. परंतु पाऊस लांबल्याने टँकर वाढतच आहेत. याशिवाय पाण्याचे स्त्रोत आटल्याने अनेक ठिकाणच्या पाणीयोजना अडचणीत येण्याची शक्यता आहे.२७ गावे, १२० वाड्यांना टँकर

जिल्ह्यात सध्या २७ गावे व १२० वाडीवस्त्यांवरील ४८ हजार ९६७ ग्रामस्थांची तहान टँकरच्या पाण्याने भागत आहे. टँकर सुरू असलेली सर्वाधिक १२ गावे पारनेर तालुक्यातील आहेत. त्यानंतर संगमनेर तालुक्यातील ८ गावांना, अकोल्यातील ३ गावांना, तर नगर तालुक्यातील ४ गावांना टँकरने पाणीपुरवठा होत आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर