शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

ई निविदा प्रणाली मर्यादेत १० लाखापर्यंत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:36 IST

पारनेर : ई निविदा प्रणालीमध्ये ३ लाखांवरून १० लाख रूपयांपर्यंत वाढ करण्याच्या राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाचे सर्वच स्तरातून स्वागत ...

पारनेर : ई निविदा प्रणालीमध्ये ३ लाखांवरून १० लाख रूपयांपर्यंत वाढ करण्याच्या राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाचे सर्वच स्तरातून स्वागत होत आहे. यामुळे मजूर संस्थांना पुन्हा बळकटी मिळणार आहे.

या मर्यादेत वाढ करण्यासंदर्भात जिल्हा बँकेचे संचालक व पारनेर बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड यांनी अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना पवार यांच्या घोषणेमुळे यश आले असून मजूर संस्थांच्या पदाधिकाऱ्यांकडून स्वागत होत आहे.

राज्यातील मजूर सहकारी संस्थापुढे अनंत अडचणी आहेत. त्यातच १० वर्षांपूर्वी कामांचे वितरण करताना १५ लाख रूपयांपर्यंतची कामे मजूर संस्थांना देण्यात येत असताना मागील सरकारच्या काळात ही मर्यादा ३ लाखांपर्यंत खाली आणण्यात आली. वास्तविक सिमेंट, लोखंड, खडी, वाळू, डबर याच्या वाढलेल्या किमतीचा विचार करता ३ लाख रूपयांपर्यंत कोणतेही काम होणे शक्य नाही. त्यासाठीच कामांच्या मर्यादेत वाढ करणे अत्यंत गरजेचे होते. या मागणीसाठी तत्कालीन विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात अनेक बैठका घेण्यात आल्या होत्या.

या बैठकांमध्ये मजूर संस्थांचे इतर काही प्रश्‍न मार्गी लागले. परंतु, कामाच्या मर्यादेेचा प्रश्‍न प्रलंबित होता. जिल्हा बँकेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत हाच मुद्दा महत्त्वाचा ठरला होता. त्यावेळी महाविकास आघाडीच्या श्रेष्ठींना कळविण्यात आल्यानंतर ही मर्यादा वाढविण्याचे मान्य करण्यात आले होते. बँकेच्या निवडणुकीनंतर गायकवाड यांनी अजित पवार, बाळासाहेब थोरात यांची भेट घेऊन अर्थसंकल्पीय अधिवेशनात हा प्रश्‍न मार्गी लावण्याचे साकडे घातले होते. त्याच वेळी शासन स्तरावर सकारात्मक निर्णय घेण्याची ग्वाही पवार व थोरात यांनी दिली होती. त्यानुसार पवार यांनी बुधवारी विधानसभेमध्ये कामाची मर्यादा तीन लाखांवरून १० लाख करण्याची घोषणा केली.

----

मजूर संस्थांच्या या जिव्हाळ्याच्या प्रश्‍नावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सकारात्मक निर्णय घेतला. यामुळे मजूर संस्थांना बळकटी मिळणार आहे.

-प्रशांत गायकवाड,

संचालक, जिल्हा बँक