शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
2
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
3
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
4
सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या
5
Viral Video : जंगलात राहणाऱ्या व्यक्तीने आयुष्यात पहिल्यांदा खाल्ला रसगुल्ला; प्रतिक्रिया पाहून तुम्हीही खूश व्हाल!
6
'या' सरकारी योजनेत ज्येष्ठांना ५ वर्षांत मिळेल १२,००,००० पेक्षा जास्त व्याज; कोण घेऊ शकतो लाभ?
7
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
8
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली
9
जिम सोडा अन् ब्रॉन्को टेस्टवर फोकस करा! टीम इंडियातील खेळाडूंना जपावा लागणार फिटनेसचा नवा 'मंत्र'
10
आरोग्य विमा आणि गंभीर आजार विम्यात काय आहे फरक? अनेकजण इन्शुरन्स घेताना करतात चूक!
11
रोज मृत्यूची भीती, तरीही खचली नाही सौंदर्यवती! कोण आहे Nadeen Ayoub? तिच्या नावाची चर्चा का?
12
श्वेताची विवाहित प्रियकरानेच केली हत्या; फिरायला घेऊन गेला आणि कार घातली तलावात, दोघांमध्ये काय बिनसलं होतं?
13
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून प्रसिद्ध खलनायकाचं कमबॅक, लूक पाहून खूश झाले चाहते
14
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
15
जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण...
16
१० हजार रुपयांत भारतीय जपानमध्ये काय काय करू शकतात? रुपयाची जपानी किंमत किती?
17
दोन वर्षाच्या मुलीसह अख्ख कुटुंब मृतावस्थेत आढळल्याने खळबळ; ५ जणांसोबत नेमकं काय घडलं? 
18
अभिनेत्रीला अश्लील मेसेज करणारा युवा नेता निघाला काँग्रेसचा आमदार, वाद होताच दिला पदाचा राजीनामा
19
4 वर्षांत तीन वेळा प्रेग्नंट, तुरुंगवासाची शिक्षा टाळण्यासाठी महिलेने भलताच मार्ग अवलंबला...! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
20
Mumbai Crime: 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार

घटना आठवली की कापरं भरतं

By admin | Updated: July 23, 2016 00:07 IST

अकोले : अर्ध्या तासात घोटीला पोहचतो! असं फोन वरुन नातेवाईकांना सांगत होतो.. तेव्हड्यात धाड-धाड गाडी आदळायला लागली.

अकोले : अर्ध्या तासात घोटीला पोहचतो! असं फोन वरुन नातेवाईकांना सांगत होतो.. तेव्हड्यात धाड-धाड गाडी आदळायला लागली. प्रवाशांचं डोकं गाडीच्या टपाला आदळत होतं, कुणी ओरडत होतं तर कुणी पडत होतं आपटी खात होतं, कुणाच डोकं फुटलेलं तर कुणाच्या हनवटीतून रक्त येत होतं. काय झालं समजायच्या आत गाडी खडकाला जोरात धाडकन आदळली अन् थांबली.. समोर २०० फुटावर खोल दरी.. सुदैवानं वाचलो! भयंकपित करणारी ही घटना आठवली की कापर भरतं.. असं इंदोरी येथील कैलास एकनाथ शिंदे सांगत होते.गुरुवारी बारी घाटात मोठी दुर्घटना होताहोता टळली. अकोले-कसारा एस. टी. बसला अपघात झाला. गाडी घाटात उताराला असताना बे्रक फेल झाले. चालक मच्छिंद्र घोडके यांनी प्रसंगावधान साधून गाडी खडकाला ठोकरली. तरी गाडी खड्ड्यात आपटत दरीकडे गेली. त्यात गाडीचा स्टेअरींग रॉड तुटला, गाडीची पुढची चाके निखळून पडली अन् गाडी दरीच्या मागे २०० फुटावर थांबली. त्या पुढे ५००-७०० फूट खोल दरी होती. यात सुदैवाने जीवित हानी झाली नाही. गाडीत ५६ प्रवासी होते पैकी चालक वाहकासह काही प्रवासी जखमी झाले. बऱ्याच जणांना मुक्कामार लागला असून मणक्याला इजा झाली़ एका महिलेचे डोके फुटले़ एका प्रवाशाच्या हनवटीला लागले. प्रवाशांवर अकोले, घोटी, राजूर तेथे उपचार करण्यात आले. जखमींना दवाखान्यात नेण्यासाठी बारी कळसुबाई परिसरातील स्थानिक आदिवासींसह अनेक पर्यटकांनी मदत केली. जिल्हा परिषद सदस्य डॉ. किरण लहामटे यांनीही ग्रामीण रुग्णालयात जाऊन जखमींवर उपचार केले.इंदोरी येथील कैलास शिंदे व त्यांच्या पत्नी हेही याच गाडीतून प्रवास करत होते.शिंदे यांचा डावा हात खांद्यापासून निखळलाय तर पत्नीला थोडी इजा झाली. ते अपघातातील तो बाका प्रसंग सांगत होते. (प्रतिनिधी)गाड्यांची दुरूस्ती होते का? प्रवाशांना शंकाकसारा गाडी अकोले आगारातून सुरु होण्यापूर्वी तिचा ‘गिअर बॉक्स’ खराब होता. तेव्हा वाहकाने दुसरी गाडी बदलून घेतली. बारी घाटात त्या गाडीचेही ब्रेक फेल झाले असे शिंदे सांगतात. एकंदर सर्वच गाड्यांची अशी दुरवस्था आहे. अकोले आगाराची गाडी कुठे बंद पडलेली दिसेल हे सांगता येत नाही. गाड्यांची दुरूस्ती केली जाते का? याबाबत प्रवाशांना शंका आहे .या आगारातील यांत्रिक विभागाचे कर्मचारी नेमके काय काम करतात? हा सवाल उपस्थित होत आहे. अकोले एस.टी.आगारात ५९ बस गाड्या आहेत. बसेसची देखभाल करण्यास ५० मेकॅनिकल स्टाफ आहे. गाड्यांची दररोज तसेच दहा दिवसांनी एकदा व तीन महिन्यांनी एकदा विशेष देखभाल केली जाते. सहा महिन्यांनी जनरल तपासणी करुन गाड्यांची योग्य देखभाल केली जाते. गाडी आगारातून ताब्यात घेतानाच चालक गाडी ट्रायल घेतात. मग गाडी आगाराबाहेर पडते. रस्त्यावरचे वाहन आहे कधी काय होईल सांगता येत नाही़ -राणी वर्पे, आगार व्यवस्थापक