शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मारहाणीत जखमी झालेल्या जवानाचा मृत्यू पारनेर तालुक्यातील घटना : तिघांवर खुनाचा गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2020 21:17 IST

सुपा (जि. अहमदनगर) : जातेगाव (ता. पारनेर) येथील मारहाणीत जखमी झालेल्या सेवानिवृत्त जवानाचा उपचारादरम्यान गुरुवारी (दि.११) मृत्यू झाला. सोमवारी (दि.८) त्याला मारहाण झाली होती.

सुपा (जि. अहमदनगर) : जातेगाव (ता. पारनेर) येथील मारहाणीत जखमी झालेल्या सेवानिवृत्त जवानाचा उपचारादरम्यान गुरुवारी (दि.११) मृत्यू झाला. सोमवारी (दि.८) त्याला मारहाण झाली होती. या प्रकरणी सुपा पोलीस ठाण्यात तिघांवर खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. मनोज संपत औटी (वय ३६, रा. जातेगाव, ता. पारनेर) असे मृत सेवानिवृत्त जवानाचे नाव आहे. याबाबत मयताचा भाऊ तुषार संपत औटी यांनी सुपा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.सोमवारी (दि.८) सायंकाळी जातेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या संरक्षक भिंतीजवळ मनोज उभा होता. त्यावेळी तेथे येऊन सौरव गणेश पोटघन, विकी दिनेश पोटघन, अक्षय बापू पोटघन यांनी ‘मुलीचा हात का धरलास’ असे म्हणत मनोज यास लोखंडी पाईप, दगडाने जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने मारहाण केली. यामध्ये तो गंभीर जखमी झाला. जखमी मनोजला उपचारासाठी नगर येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्याचा उपचारादरम्यान गुरुवारी (दि.११) मृत्यू झाला. या प्रकरणी सौरव गणेश पोटघन, विकी दिनेश पोटघन, अक्षय बापू पोटघन (सर्व. रा. जातेगाव, ता. पारनेर) यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. सेवानिवृत्त जवानाचा मृत्यू झाल्याने गावात तणाव वाढला असून पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. सहा महिन्यापूर्वीच मनोज हा सेवानिवृत्त झाला होता. तिन्ही आरोपी फरार असून त्यांना तातडीने अटक करावी, अशी मागणी मृताच्या नातेवाईकांनी केली आहे.