शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

परतीच्या पावसाचा जिल्हाभरात धुमाकूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 18:33 IST

पावसामुळे शाळेच्या मैदानाला तळ्याचे स्वरुप आले असनू, प्राथमिक आरोग्य केंद्राजवळील बुद्धविहारालाही पाण्याने वेढले़. दोन दिवस झालेल्या जोरदार पावसामुळे सगळीकडे पाणीच पाणी झाले.

अहमदनगर : परतीच्या पावसाने जिल्हाभरात धुमाकूळ घातला असून, अतिपावसामुळे काही ठिकाणी पिकांचे नुकसान झाले आहे़ तर काही ठिकाणी बंधारे वाहून गेले आहेत़ मुळा व गोदावरीला पूर आला आहे़संगमनेर तालुक्यातील दुष्काळी पट्टा म्हणून ओळखल्या जाणा-या तळेगाव दिघे परिसरात परतीच्या पावसाचे जोरदारपणे आगमन झाले. पावसामुळे शाळेच्या मैदानाला तळ्याचे स्वरुप आले असनू, प्राथमिक आरोग्य केंद्राजवळील बुद्धविहारालाही पाण्याने वेढले. दोन दिवस झालेल्या जोरदार पावसामुळे सगळीकडे पाणीच पाणी झाले. त्यामुळे बळीराजा सुखावला आहे. गावक-यांच्या म्हणण्यानुसार गेल्या पाच सहा वर्षांपासून असा जोरदार पाऊसच झाला नव्हता. पावसामुळे संपूर्ण तळेगाव परिसरात आनंद व्यक्त होत आहे. कारण आतापर्यंत विहिरी, नाले, तळे पावसाळा संपत आला तरी कोरडी ठाकच होती. आता सगळीकडे पाणीच पाणी झाल्यामुळे तळेगाव परिसरातून आनंद व्यक्त होत आहे.

अति पावसामुळे कांदा, भुईमुगाचे नुकसान

संगमनेर तालुक्याच्या पठार भागात सुरू असलेल्या सलग पावसामुळे ऐन काढणीस सुरूवात झालेल्या लाल सेंद्रीय कांदा व भुईमूग या नगदी पिकांचे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरीवर्ग हवालदिल झाले आहेत. पठार भागात खरीप हंगामात बाजरी, कांदा, भुईमूग ही पिके प्रमुख आहेत. यावर्षीही सुरूवातीच्या दमदार पावसांमुळे या पिकांच्या पेरणीखालील क्षेत्रात वाढ झाली. वेळोवेळी झालेल्या पावसाने या पिकांची वाढ जोमाने झाली. बाजरी कापणीच्या वेळी जोरदार पाऊस झाला. मात्र त्यानंतर पावसाने उघडीप दिल्याने बाजरीच्या मळणीची कामे पूर्ण झाली. सततच्या ऊन-पावसाच्या तापमान बदलांमुळे नांदूर खंदरमाळ, सारोळेपठार व लगतच्या गावांमधील जवळपास पंधराशे हेक्टर कांद्यावर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला.

शेतक-यांपुढे संकट

कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे व पोहेगाव परिसरातील पिकांचे पावसामुळे नुकसान झाले आहे. अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर पोहेगाव परिसरात परतीचा पाऊस पडत आहे. काही ठिकाणी समाधानकारक तर काही ठिकाणी रिमझिम पाऊस झाला. २-३ दिवसांपासून निर्माण झालेले ढगाळ वातावरण डाळींब व इतर पिकांना पोषक नाही. परतीच्या पावसाचा मोठा फटका बाजरी, सोयाबीन, मका आदी पिकांना मोठ्या प्रमाणात बसला आहे. मुसळधार पावसाने शेतातील पिके आडवी होऊन सडू लागली आहेत. आधीच शेतीमालाला भाव नाही. त्यात परतीच्या पावसाने हातचे पिक नासविल्याने शेतकºयांपुढे संकट उभे राहिले आहे.