शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

अकोळनेरच्या मल्लाकडून दोन मिनिटात पंजाबचा कोहली चितपट!

By अरुण वाघमोडे | Updated: April 12, 2023 15:21 IST

चित्तथरारक झालेल्या या लढतील अवघ्या दोन मिनिटात मंदार याने कोहलीला चितपट करत दोन लाखांच्या बक्षीसासह मानाची गदा पटकाविली.

अहमदनगर : नगर तालुक्यातील अकोळनेर येथे भैरवनाथ यात्रेनिमित्त आयोजित कुस्त्यांच्या आखाड्यात शेवटची मानाची कुस्ती अकोळनेर येथील मल्ल मंदार मेहेत्रे आणि पंजाब येथील मल्ला लाडी कोहली यांच्यात रंगली. चित्तथरारक झालेल्या या लढतील अवघ्या दोन मिनिटात मंदार याने कोहलीला चितपट करत दोन लाखांच्या बक्षीसासह मानाची गदा पटकाविली.

अकोळनेर येथे तीन दिवस भैरवनाथ यात्रेचे आयोजन सरपंच प्रतिक शेळके यांच्या नेतुत्वाखाली करण्यात आले होते. तीन दिवस चाललेल्या यात्रेत कावडीची मिरवणूक, छाबीना, लोकनाट्य तमाशा, रक्तदान शिबिर, आर्केस्ट्रा असे भरगच्च कार्यक्रम घेण्यात आले होते. मंगळवारी सायंकाळी कुस्त्यांचा आखाडा रंगला. या कुस्त्या पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. 

यावेळी खासदार डॉ. सुजय विखे, आमदार निलेश लंके, माजी आमदार शिवाजी कर्डीले, माजी जिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखडे, सरपंच प्रतिक शेळके आदी उपस्थित होते. दुपारी साडेतीन वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत कुस्त्या रंगल्या होत्या. कुस्त्या रोमाचंकारी व निकाली असल्यामुळे प्रेक्षकांची शेवटपर्यंत गर्दी केली होती. यावेळी उपस्थितांनी मल्लांवर बक्षिसांचा वर्षाव केला. शेवटची मानाची कुस्ती प्रेक्षकांनी श्वास रोखून पाहिली. यात मंदारने कोहलीला चितपट केले.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर