अहमदनगर : सावित्रीच्या लेकींनी सर्वच क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे. कौटुंबिक जबाबदारी सांभाळून महिला समाजाच्या जडण-घडणीत महत्त्वाचे योगदान देत आहेत. मुलांवर संस्कार करुन समाज घडविण्याचे कार्य महिला करीत आहेत. सावित्रीबाईंनी महिलांना स्त्री शिक्षणाचे दार उघडे करुन दिल्याने महिलांनी घरचा उंबरा ओलांडून राष्ट्रपती, पंतप्रधान पदापर्यंत जाऊन कर्तृत्व सिद्ध केले, असे जिल्हा बँकेचे ज्येष्ठ संचालक व माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी सांगितले.
फिनिक्स सोशल फाउंडेशनच्या वतीने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृती दिनानिमित्त नागरदेवळे (ता. नगर) येथे युट्यूब स्टार सुमन धामणे, माधुरी जाधव, कार्यकारी अभियंता सायली पाटील, प्रा. सीमा गायकवाड, हिराबाई बोरुडे, सामाजिक कार्यकर्त्या शारदा होशिंग, जागृती ओबेरॉय यांना कर्डिले यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले स्मृती गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी माजी नगरसेवक अॅड. धनंजय जाधव, नगरसेविका पुष्पा बोरुडे, सुप्रिया जाधव, सरपंच सविता पानमळकर, फिनिक्स फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जालिंदर बोरुडे, प्रा. दिलीप गायकवाड, राम पानमळकर, रतन तुपविहिरे आदी उपस्थित होते.
प्रारंभी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन त्यांना अभिवादन करण्यात आले. सूत्रसंचालन राजेंद्र बोरुडे यांनी केले. आभार गौरव बोरुडे यांनी मानले. कार्यक्रमासाठी किरण कवडे, ओमकार वाघमारे, किशोर गांगर्डे, बाबासाहेब धीवर, सौरभ बोरुडे, ओम बोरुडे, सागर बनकर, प्रभाकर धाडगे, मोहनीराज कुऱ्हे, सुदाम वाबळे, अर्जुन कराळे, साई धाडगे आदींनी परिश्रम घेतले.
..................
११ फिनिक्स फाउंडेशन
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृती दिनानिमित्त फिनिक्स फाउंडेशनच्या वतीने महिलांचा पुरस्कार देऊन गौरव करताना माजी आमदार शिवाजी कर्डिले. समवेत अॅड. धनंजय जाधव, पुष्पा बोरुडे, सुप्रिया जाधव, सरपंच सविता पानमळकर, जालिंदर बोरुडे आदी. (छायाचित्र : वाजिद शेख)