शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

नवीन दारुबंदी कायद्याची नगरमधून अंमलबजावणी करणार-बावनकुळे

By admin | Updated: April 19, 2017 16:32 IST

नवीन दारुबंदी कायद्याचा मसुदा तयार करण्यात आला असून, या कायद्यात एकूण ३९ मुद्यांचा समावेश करण्यात आला आहे़

आॅनलाइन लोकमतराळेगणसिद्धी (अहमदनगर) दि़१९- महाराष्ट्र राज्य नवीन दारुबंदी कायद्याचा मसुदा तयार करण्यात आला असून, या कायद्यात एकूण ३९ मुद्यांचा समावेश करण्यात आला आहे़ त्यातील तीन मुद्यांवर राज्य उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याशी चर्चा केली़ अण्णांनी सुचविलेल्या ग्राम सुरक्षा दलाला या कायद्याने मूर्त स्वरुप दिले असून, त्याची अंमलबजावणी नगरमधून सुरु होणार असल्याची माहिती बावनकुळे यांनी दिली़बुधवारी दुपारी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची राळेगणसिद्धी येथे मंत्री बावनकुळे यांनी भेट घेतली़ नवीन दारुबंदी कायद्याचा मसुदा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आला आहे़ या मसुद्याबाबत मंत्रालयात अनेक बैठका झाल्या आहेत़ हा मसुदा अंतिम टप्प्यात असून, या कायद्याद्वारे अण्णा हजारे यांनी सुचविलेले ग्रामसुरक्षा दल अस्तित्वात येणार आहे़ या ग्रामसुरक्षा दलाचा पथदर्शी प्रयोग नगर जिल्ह्यात राबविण्यात येणार असून, त्यानंतर राज्यभर ग्रामसुरक्षा दल अस्तित्वात येणार आहे़ ग्रामसुरक्षा दलाच्या सुचनेनुसार पोलिसांनी १२ तासाच्या आत दारुबंदीबाबत कारवाई करणे आवश्यक आहे़ ही कारवाई करण्यास अथवा ग्रामसुरक्षा दलांना सहकार्य नाकारणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई करण्यात येणार आहे़ ग्रामसुरक्षा दलांना विशेषाधिकार देण्याबाबत हजारे व बावनकुळे यांच्यामध्ये चर्चा झाली़ हे ग्रामसुरक्षा दल ३० जूनपर्यंत स्थापन करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या असून, ग्रामसुरक्षा दलाच्या प्रमुखांची १५ जून रोजी राळेगणसिद्धी येथे बैठक घेण्याचा निर्णय हजारे व बावनकुळे यांच्यातील चर्चेदरम्यान घेण्यात आला आहे़