शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तुमची अनेक प्रकरणे पाहिली आहेत; बोललो तर उगाच...", CJI गवईंनी ईडीला फटकारले
2
गायिका मैथिली ठाकूरचा भाजपमध्ये प्रवेश! दुसऱ्या यादीत येणार नाव, कोणत्या मतदारसंघातून लढणार?
3
BJP Candidate list: भाजपने १० विद्यमान आमदारांची तिकिटं कापली, ५ जण आहेत माजी मंत्री; पहिल्या यादीमध्ये कोण?
4
३१ व्या मजल्यावरून पडला, चप्पल, मोबाईल सापडले २४ व्या मजल्यावर, तरुणाच्या मृत्यूचं गुढ वाढलं   
5
लष्कराकडून जेन-Z वर गोळीबार करण्यास नकार, जीव वाचवून राष्ट्रपती देशाबाहेर पसार, या देशात अराजक
6
वेस्ट इंडीजच्या नाकी नऊ आणणाऱ्या रवींद्र जडेजाची सचिन-सेहवागच्या विक्रमाशी बरोबरी!
7
...अन् हमासने बिपिन जोशीचा मृतदेहच सोपवला, लेकाच्या सुटकेसाठी अमेरिकेचेही दार ठोठावणाऱ्या आईवर मोठा 'आघात'
8
विक्रमी वाढ, चांदी १,९५,००० रुपयांवर, इतिहासात प्रथमच एका दिवसात १५,००० रुपयांनी महागली
9
अखेर मुहूर्त सापडला! वैभव खेडेकरांचा भाजपा प्रवेश झाला, मनसेला फटका, राजकीय समीकरणे बदलणार
10
स्वेटर, कानटोपी, हातमोजे अन् ब्लँकेट...! तयार रहा, ८६ टक्के हिमालयाला बर्फाने आच्छादले
11
भूतबाधा उतरवण्याच्या नावाखाली भोंदूबाबाचा महिलेवर बलात्कार; व्हिडिओ रेकॉर्ड करून ब्लॅकमेल!
12
टाटाची दिवाळीपूर्वीच शॉपिंग! जगात दबदबा वाढविण्यासाठी चिनी कंपनीच घेतली विकत
13
असाही असतो बॉस! कामाचा ताण नाही, फक्त मनसोक्त आराम; म्हणाले दिवाळीत २ किलो वजन वाढवून या
14
प्रेमानंद महाराजांना नेमका कोणता आजार झालाय? यात मृत्यूचा धोका आहे का? जाणून घ्या...
15
हवेतच कतार एअरवेजच्या विमानात बिघाड; अहमदाबादमध्ये इमर्जन्सी लँडिंग, मोठा अपघात टळला!
16
"महाराष्ट्रात राहायची लायकी नाही", बिकिनीतील फोटोंवर आक्षेपार्ह कमेंट, अभिनेत्रीचं सडेतोड उत्तर, म्हणाली...
17
LIC कडून दिवाळीचा 'डबल धमाका'! मध्यमवर्गीयांसाठी २ नवीन 'रिस्क फ्री' योजना लाँच, शेअर झाला रॉकेट
18
मंत्रिमंडळ मोठे निर्णय! बांबू उद्योग धोरण जाहीर, ५ लाख रोजगार; मुंबई HC मध्ये २२२८ पदांना मान्यता
19
राज ठाकरे पहिल्यांदाच ‘मविआ’ नेत्यांसोबत दिसले; CM फडणवीस म्हणाले, “भाजपा अन् महायुती...”
20
हरयाणात काय चाललंय? ASI ची गोळी झाडून आत्महत्या; दिवंगत IPS पूरन कुमार यांच्यावर गंभीर आरोप

पिकांचे पुराव्यानिशी तातडीने पंचनामे करावेत-विजय वडेट्टीवार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2019 16:06 IST

अधिका-यांनी तातडीने पुराव्यासह पंचनामे करून सादर करावेत़. शासनाच्या तिजोरीत खडखडात असल्याने मदत मिळण्याबाबत संशयास्पद वातावरण आहे़. वेळेप्र्रसंगी दबाव आणून शेतक-यांना न्याय मिळवून दिला जाईल, अशी ग्वाही विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिली़.

राहुरी : पावसामुळे शेतातील उभ्या पिकांची मोठ्या प्रमाणावर नासाडी झाली आहे़. अधिका-यांनी तातडीने पुराव्यासह पंचनामे करून सादर करावेत़. शासनाच्या तिजोरीत खडखडात असल्याने मदत मिळण्याबाबत संशयास्पद वातावरण आहे़. वेळेप्र्रसंगी दबाव आणून शेतक-यांना न्याय मिळवून दिला जाईल, अशी ग्वाही विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिली़.विरोधी पक्षनेते वडेटटीवार यांनी रविवारी राहुरी पंचायत समितीच्या सभागृहात आधिका-यांच्या बैठकीत नुकसानीचा आढावा घेतला़. वडेट्टीवार म्हणाले, पावसामुळे राज्यावर मोठे संकट आले आहे़. अशा परिस्थीतीत काँगे्रस व राष्ट्रवादी काँगे्रस शेतक-यांच्या पाठीशी आहे़. बिकट परिस्थीतीत शेतक-यांना शासनाकडून मदत मिळवून दिली जाईल़. त्यासाठी आधिका-यांनी वेळ निघून जाण्याच्या आगोधर पंचनामे करावेत़. कपाशी, सोयबीन, भाजीपाला आदी पिकांचे मोठ्या  प्रमाणावर नुकसाने झाले आहे़. आम्ही सत्तेवर असू किंवा नसू. मात्र दोन्ही काँगे्रस शेतक-यांच्या बाजूने आहोत़. राज्यावर नैसर्गिक संकट आले आहे़ अधिका-यांनी पंचनामे व्यवस्थित करावेत अन्यथा निलंबित केले जाईल. उंबरे ब्राम्हणी भागात पावसामुळे शेतक-यांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे़. शेतक-यांना योग्य प्रमाणावर भरपाई मिळावी म्हणून पाठपुरावा केला जाईल़.पंचायत समितीच्या सभागृहात आमदार प्राजक्त तनपुरे यांनी स्वागत केले़. प्रांताधिकारी अनिल पवार, तहसीलदार एफ. आर. शेख, तालुका कृषि आधिकारी महेंद्र ठोकळे, बाळासाहेब आढाव, नंदु गागरे, प्रकाश देठे, अमोल जाधव  उपस्थित होते़.विरोधी पक्षनेते विजय वडेवटटीवार यांनी राहुरी कृषि उत्पन्न बाजार समितीला भेट दिली़. सभापती अरूण तनपुरे यांनी स्वागत केले़. उपसभापती आण्णासाहेब गागरे, रामदास माने, एकनाथ तनपुरे  उपस्थित होते़.ब्राम्हणीत पिकांची पाहणी  वडेटटीवार यांनी उंबरे व ब्राम्हणी येथील शेतकरी नारायण हापसे, विश्वनाथ तारडे यांच्या शेतात जाऊन नुकसानीची पहाणी केली़. पावसामुळे कपाशी, मका, बाजरी या पिकाच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केली़. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरVijay Vadettiwarविजय वडेट्टीवार