शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

अवैध वाळू उपसा : नाशिक-पुणे महामार्गावरील पुलांना धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2018 18:29 IST

नाशिक-पुणे महामार्गावर संगमनेरातील प्रवरा नदीवरील नव्या व जुन्या पुलांजवळच वाळूचा अवैध उपसा होत असल्याने दोन बड्या महानगरांना जोडणाऱ्या तीन पुलांना धोका निर्माण होवून नदीपात्रात मोठे खड्डे पडले आहेत.

संगमनेर : नाशिक-पुणे महामार्गावर संगमनेरातील प्रवरा नदीवरील नव्या व जुन्या पुलांजवळच वाळूचा अवैध उपसा होत असल्याने दोन बड्या महानगरांना जोडणाऱ्या तीन पुलांना धोका निर्माण होवून नदीपात्रात मोठे खड्डे पडले आहेत. तसेच प्रवरा नदीकाठी असलेले ऐतिहासिक घाटही या वाळू उपशाने खचले आहेत.संगमनेर तालुक्यातून रात्रंदिवस सुरू असलेल्या या अवैध वाळू उपशाकडे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनीच लक्ष घालावे, अशी मागणी आता संगमनेरातील पर्यावरण प्रेमी नागरिकांनी केली आहे. नाशिक-पुणे या दोन बड्या महानगरांना जोडणा-या प्रवरानदीवरील पुलाची निर्मिती ब्रिटीशांनी केली होती. या पुलास समांतर असा पुल चार वर्षांपूर्वी बांधण्यात आला. त्यानंतर नाशिक-पुणे बाह्यवळण रस्त्यावरही प्रवरानदीवर पुलाची बांधणी करण्यात आली.या तिन्ही पुलांवरून मोठ्या प्रमाणात वाहतूक होते. प्रवरानदी पात्रातील वाळूला मोठी मागणी आहे. मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेल्या वाळूमुळे वाळू माफिया मालामाल झाले असून त्यांनी प्रवरानदीपात्र ओरबाडण्याचे काम सुरू केले आहे. हे वाळू माफिया निर्सगाबरोबरच लोकांच्या जीवाशीही खेळत आहेत. ब्रिटीशकालीन पुल, त्यास समांतर पुल व बाह्यवळण रस्त्यावरील पुलाखालून मोठ्या प्रमाणात वाळू उपसली गेल्याने पुलाचा पाया पुर्णपणे उघडा पडला आहे. त्यामुळे या तिन्ही पुलांना धोका निर्माण झाला आहे. तसेच शहरातून वाहणाºया प्रवरानदी तिरावर अनेक ऐतिहासिक घाट आहेत. या ठिकाणीही मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरू असल्याने हे खड्डे होवून घाटही खचले आहेत. याकडे मात्र, महसूल विभाग ‘अर्थपूर्ण’पणे डोळेझाक करीत असल्याचा आरोप पर्यावरण प्रेमी नागरिकांनी केला आहे. दळणवळणासाठी महत्वाच्या असलेल्या या तिन्ही पुलांच्या सुरक्षिततेसाठी जिल्हाधिकारी राहूल द्विवेदी यांनीच लक्ष घालावे, अशी मागणी आता होते आहे.पुराव्यासह तक्रार करणारजिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी संगमनेरात येवून अवैध वाळू उपशामुळे प्रवरा, म्हाळूंगी व मुळा नदीपात्राची झालेली दुरावस्था पाहावी. तालुक्यात वाळूचा एकही लिलाव झाला नसून नदीपात्रातून मात्र, मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरू आहे. वाळू माफियांशी लागेबांधे असलेल्या महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कारवाई व्हावी. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे पुराव्यासह तक्रार करणार आहे. - अमोल खताळ, सामाजिक कार्यकर्ते, संगमनेर 

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSangamnerसंगमनेर