श्रीरामपूर : ग्रामपंचायत निवडणुकीत शांततेचा भंग होणार नाही, याची सर्वांनी काळजी घ्यावी. गावाला सर्वांनीच आपले कुटुंब समजावे. गैरकृत्य केल्यास कोणाचीही गय केली जाणार नाही, असा इशारा प्रशिक्षणार्थी पोलीस निरीक्षक आयुष नोपानी यांनी दिला.
ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पोलीस चौकीत विविध पक्षांचे स्थानिक पदाधिकारी, पत्रकार व ग्रामस्थांची बैठक घेण्यात आली. त्यावेळी नोपाणी यांनी मार्गदर्शन केले. नोपाणी म्हणाले, घटनेची चौकट आणि कायद्याच्या चाकोरीत राहून काम करण्याचा सर्वांना अधिकार आहे. मात्र ते सोडून जर कोणी व्यक्ती निवडणूक प्रक्रियेत बाधा आणून समाजविघातक कृत्य करीत असेल तर ताबडतोब पोलिसांना कळवा. त्यांच्यावर कोणताही पक्षपात न करता त्वरित गुन्हे दाखल केले जातील.
बैठकीस जि. प. सदस्य शरद नवले, बाजार समिती संचालक सुधीर नवले, माजी सरपंच भरत साळुंके, सुनील मुथा, रविंद्र खटोड, पोलीस पाटील अशोक प्रधान, युवराज जोशी, कैलास चायल, अशोक पवार, जावेद शेख, अकबर सय्यद,प्रा. अशोक बडधे,अजय डाकले, द्वारकानाथ बडधे, ज्ञानेश गवले हवालदार अतुल लोटके, रामेश्वर ढोकणे, निखिल तमनर आदी उपस्थित होते.