शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

निधी मिळाला तर व्हीजन...नाही तर आमदारांना करावे लागेल भजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 12:09 IST

अहमदनगर : आमदारांच्या स्थानिक विकास निधीत सरकारने वाढ केली खरी, पण कोरोनामुळे सरकारचीच तिजोरी रिकामी झाली आहे़ पैसे नसल्याने सरकारने आमदारांच्या निधीला तुर्तास तरी कात्री लावली आहे़ त्यामुळे मतदारसंघातील ‘व्हिजन-२०२०’ पूर्ण करण्यासाठी सत्ताधारी विरोधी पक्षाच्या आमदारांचा चांगलाच कस लागणार आहे़ निधी मिळाला तरच आमदारांचे व्हीजन साकार होणार आहे. निधी मिळाला नाही तर सरकार दरबारी निधीसाठी आमदारांना ‘भजन’ आळवावे लागणार आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कअहमदनगर : आमदारांच्या स्थानिक विकास निधीत सरकारने वाढ केली खरी, पण कोरोनामुळे सरकारचीच तिजोरी रिकामी झाली आहे़ पैसे नसल्याने सरकारने आमदारांच्या निधीला तुर्तास तरी कात्री लावली आहे़ त्यामुळे मतदारसंघातील ‘व्हिजन-२०२०’ पूर्ण करण्यासाठी सत्ताधारी विरोधी पक्षाच्या आमदारांचा चांगलाच कस लागणार आहे़ निधी मिळाला तरच आमदारांचे व्हीजन साकार होणार आहे. निधी मिळाला नाही तर सरकार दरबारी निधीसाठी आमदारांना ‘भजन’ आळवावे लागणार आहे. राज्यात सत्तांतर होऊन महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले़ अर्थ व नियोजनमंत्री अजित पवार यांनी पहिल्याच अधिवेशानात आमदारांवर निधीची खैरात केली़ त्यांचा स्थानिक विकास निधी २ वरून ३ कोटी केला़ एकदम एक कोटींची बक्षिसी मिळाल्याने आमदारही खूश होते़ जिल्ह्यात विधानसभेचे १२, तर विधानपरिषदेचे २ असे, १४ सदस्य आहेत़ आमदारांच्या स्थानिक विकास निधीत १ कोटींची वाढ झाल्याने चालूवर्षी जिल्ह्यात ४२ कोटी रुपये विकास कामांसाठी मिळाले असते़ परंतु, कोरोनामुळे आता ७ कोटींवर समाधान मानावे लागेल़ यापैकी प्रत्येकी २० लाख, याप्रमाणे २ कोटी ८० लाख नियोजनकडे जमा झाले आहेत़ हा निधीही आरोग्यावर खर्च करावा, अशी अट आहे़ त्यामुळे पहिले वर्षे ‘कोरोना जा’, असे म्हणण्याची वेळ आमदारांवर आली आहे़जिल्ह्यातील कोपरगाव, नेवासा, राहुरी, पारनेर, श्रीगोंदा, कर्जत- जामखेड मतदारसंघात सत्तांतर झाले़ अकोल्यात राष्ट्रवादीने, तर श्रीरामपुरात काँग्रेसने उमेदवार बदलले़ हे दोन्ही नवखे उमेदवार विधानसभेवर निवडून गेले आहेत़ अशा आठ मतदारसंघातील मतदारांनी बदल घडविला़ मतदारांची अपेक्षा पूर्तीचे हे पहिलेच वर्षे होते़ आजी-माजी आमदारांच्या कामाची तुलना मतदारांना यावर्षात करता आली असती़ पण, सरकारने आमदारांचा निधी गोठविला़  त्यामुळे मतदारसंघातील जनतेला निवडणूक काळात दिलेली अश्वासने पूर्ण करताना सर्वच आमदारांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे़ मंत्र्यांकडे जे पाठपुरवा करतील, त्यांना वेगवेगळया योजनांतून निधी मिळेल़ पण, त्यासाठी आमदारांना आपले वजन वापरावे लागेल़ त्यात सहा आमदार पहिल्यांदाच निवडून आलेले आहेत़ त्यामुळे त्यांना मतदारसंघात कामे करताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे़ पहिल्यांदा निवडून आलेल्यांमध्ये सर्वाधिक पाच आमदार राष्ट्रवादीचे आहेत़--मंत्र्यांच्या भूमिकेकडे लक्षनगर जिल्ह्याला बाळासाहेब थोरात, शंकरराव गडाख आणि प्राजक्त तनपुरे यांच्या रुपाने तीन मंत्री लाभले आहेत़ पालकमंत्रीपद राष्ट्रवादीकडे आहे़ हे मंत्री निधीसाठी सरकारकडे किती पाठपुरावा करतात, यावरच जिल्ह्यातील मोठ्या प्रकल्पांचे भवितव्य अवलंबून आहे़

 विरोधकांना आयते कोलीतविकास कामांना निधी मिळणार नाही़ आडातच नाही, तर पोहºयात येणार कुठून? अशी अवस्था आहे़ विकास कामे तर नाहीच, पण आरोग्याचे प्रश्नही निर्माण झाले आहेत़ त्यामुळे मतदारसंघातील विरोधकांना हे आयते कोलीत मिळाले असून त्यांच्याकडून आमदारांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न होईल़ त्यामुळे आमदारांची दुहेरी कोंडी कोरोनामुळे होणार आहे़