शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

जगतापांचे नाव काँग्रेसला भोकाडी दाखविण्यासाठी : आमदार शिवाजी कर्डीले 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2018 14:48 IST

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार बोलतात एक आणि कृती वेगळीच करतात, तसा त्यांचा इतिहास आहे. अरुणकाका जगताप यांना पुढे केले आहे. पण कॉँॅग्रेसला भोकाडी दाखवायला त्यांना उमेदवारी जाहीर केली असेल्याचे मला वाटते.

ठळक मुद्देपवार बोलतात एक कृती वेगळीच हा इतिहास

श्रीगोंदा : शरद पवार बोलतात एक आणि कृती वेगळीच करतात. तसा त्यांचा इतिहास आहे. अरुणकाका जगताप यांचे नाव त्यांनी लोकसभेसाठी पुढे केले आहे. पण, कॉँॅग्रेसला भोकाडी दाखविण्यासाठी त्यांनी ही खेळी केली आहे. पवारांनी शब्द खरा केला तर जगतापांचे काम करण्याची तयारी आहे, अशा शब्दात भाजपचे आमदार शिवाजी कर्डीले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची खिल्ली उडविली. श्रीगोंदा तालुक्यातील पिंपळगाव पिसा येथील कुकडी साखर कारखान्याचा बॉयलर अग्निप्रदिपन प्रसंगी कर्डिले बोलत होते. आमदार कर्डिले म्हणाले, मी शेतक-यांचा पुढारी आहे. त्यामुळे सहकारी साखर कारखान्यांना मदत करतो. व्यासपीठावर मी एकटाच भाजपाचा आहे.  सरकारने शेतक-यांना सर्वाधिक मदत केली. बोंड अळीच्या शेतक-यांना नुकसानीपोटी ३५ कोटींची मदत केली. त्यामुळे केंद्रात आणि राज्यात पुन्हा भाजपचीच सत्ता येणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी आमदार अरुण जगताप यांचेही भाषण झाले. शरद पवारांनी लोकसभेला उमेदवारी करण्याच्या सुचना दिल्याचे ते म्हणाले. यावेळी कुकडी साखर कारखान्याचे अध्यक्ष आमदार राहुल जगताप, नागवडे साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे,  हरिदास शिर्के उपस्थित होते. 

भाजपाची उमेदवारी जगतापांना! आमदार राहुल जगताप यांचे पितृछत्र हरपले आहे. तुम्ही सर्वांनी त्यांना ताकद द्या. मी तर आहेच मागे पण श्रीगोंदेकर लयभारी. काय करतील भरवसा नाही. ऐनवेळी परिस्थिती बदलली तर आमदार राहुल जगताप यांना भाजपाची उमेदवारी घ्यावी लागेल, अशी गुगली कर्डिलेंनी टाकताच एकच हशा पिकला. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrigondaश्रीगोंदा