शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना वाढला तर अर्थव्यवस्था धोक्यात येईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:21 IST

अहमदनगर : कोरोना अजून संपलेला नाही. कोरोनाचे नियम अजून लागू आहेत. मात्र, लोकांकडून नियमांचे पालन होत नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव ...

अहमदनगर : कोरोना अजून संपलेला नाही. कोरोनाचे नियम अजून लागू आहेत. मात्र, लोकांकडून नियमांचे पालन होत नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला तर देशाची अर्थव्यवस्था पुन्हा धोक्यात येऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.

अहमदनगर येथील एका खासगी रुग्णालयाच्या विस्तारीत इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमात पवार बोलत होते. यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ, ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, आमदार अरुण जगताप, आमदार संग्राम जगताप, आमदार निलेश लंके आदी उपस्थित होते. यावेळी पवार म्हणाले, दो गज दुरी, मास्क है जरूरी अशी जागृती केली जाते, मात्र कार्यक्रमात तर सर्वजण खांद्याला खांदे लावून बसलेले आहेत. अनेकांच्या तोंडाला मास्कही नाहीत. कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे नगर जिल्ह्यातील प्रमाण हे देशातील प्रमाणापेक्षा चांगले असून ते ९७ टक्के इतके आहे. ही गोष्ट चांगली असली तरी कोरोना अजून संपलेला नाही, हे लोकांनी ध्यानी घेतले पाहिजे. युरोपमध्येही परिस्थिती गंभीर आहे. इंग्लंडमध्ये ३५ दिवसांचा लॉकडाऊन करण्यात आला आहे. पाश्चात्यांपेक्षा भारतीयांची इम्युनिटी चांगली असल्याचे सांगितले जात असले तरी लोकांनी नियमांकडे दुर्लक्ष करू नये. देशातील उपचार सुविधांना मर्यादा आहेत,याचे भानही लोकांनी ठेवले पाहिजे.

---

वैद्यकीय क्षेत्रात एकी, राजकारणात गटबाजी

वैद्यकीय गुणवत्ता असलेले डॉक्टर नगर शहरात अनेक वर्षे एकत्रपणे काम करीत आहेत. नगर जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रात अनेकांनी एकत्र राहणे शक्य नाही.

राजकारणात अखंड गटबाजी पहायला मिळते. वैद्यकीय क्षेत्रात सर्व डाॅक्टर एखादा प्रकल्प हातात घेतात आणि उत्तम काम करतात, हे एकीचे आगळेवेगळे दर्शन नगर जिल्ह्यात पहायला मिळाले. नगर जिल्ह्यातील एकूणच परिस्थिती वैद्यकीय क्षेत्राने बदलली आहे, असे पवार यांनी सांगितले. डॉक्टर आणि रुग्णांमध्ये कौटुंबिक संबंध असावेत, रुग्णांना डॉक्टरांबद्दल विश्वास वाटावा, असे काम डॉक्टरांनी केले पाहिजे, असा सल्लाही पवार यांनी दिला.

----

गरिबांकडूून पैसे मागू नका

कोरोनाकाळात शहरातील सर्वच डॉक्टरांचे योगदान चांगले होते. म्हणूनच कोरोनावर मात करू शकलो. मात्र, अजूनही कोरोनाचा धोका टळलेला नाही. आयुष्यमान भारत आणि महात्मा फुले जीवनदायिनी योजना लागू केल्यानंतर रुग्णांकडून पैसे मागू नका. रुग्णांना मोफत सेवा द्या. त्यांचे आशीर्वाद हॉस्पिटलचे मजले वाढविण्यासाठी कामी येतील, अशी अपेक्षा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी खासगी हॉस्पिटलच्या डॉक्टरांकडून व्यक्त केली.