खर्डा : बारा ज्योर्तीलिंगापैकी येथील ओंकारेश्वर मंदिरातील चोरीस गेलेल्या मुर्त्यांपैकी एक मुर्ती शुक्रवारी (दि़२०) सकाळी सापडली़ओंकारेश्वर मंदिरात ७ जानेवारी २०१४ रोजी लाखो रुपये किमतीच्या ँमूर्ती चोरीला जाण्याचा प्रकार घडला होता़ मंदिरातील १५ किलो वजनाची शंकराची मूर्ती, १० किलो वजनाची पंचधातुची पद्मावती देवीची मूर्ती, ७ किलो पंचधातुची दोन ते अडीच फूट उंचीची अर्धनारी नटेश्वराची मूर्र्ती, १० किलोची पाचफनी पितळी नागाची मूर्ती, भगवान विष्णुसमोरील दोन छोट्या मुर्त्या, छोट्या नागमुर्त्या चोरीस गेल्या होत्या़ याबाबत मंदिरातील पुजाऱ्याने जामखेड पोलिसात फिर्याद दिली होती़ मात्र, या मुर्तींचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले नाही़ चोरीस गेलेल्या मुर्तींपैकी पाचफनी पितळी नागाची व शंकराची मुर्ती शिवरात्रीच्या अगोदर कानिफनाथ मंदिर परिसरात नागरिकांना आढळून आली होती़ त्यानंतर शुक्रवारी पद्मावती देवीची मूर्र्ती शनिमंदिर परिसरात आढळून आली़ ओंकार इंगळे, शंकर मोहोळकर, बाबा मापाडी या युवकांना ही मूर्ती आढळली. मूर्ती सापडल्याचे समजातच राष्ट्रवादी युवक काँगे्रसचे शहराध्यक्ष सावता लोखंडे, दत्ता योगे, डॉ़ गणेश थोरात आदींनी शनिमंदिराकडे धाव घेतली़ त्यानंतर येथे दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली. (वार्ताहर)
पाच महिन्यानंतर सापडली मूर्ती
By admin | Updated: June 21, 2014 00:46 IST