शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
3
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
4
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
5
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
6
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
7
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
8
आयोग नव्हे, मतदारच राजा !
9
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
10
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
11
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
12
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
13
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
14
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
15
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
16
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
17
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
18
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
19
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
20
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई

अहमदनगर जिल्ह्यात ‘एचव्हीडीएस’ योजनेस प्रारंभ : नगर तालुक्यातील रवींद्र उकांडे यांना मिळाली पहिली वीजजोडणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2018 18:21 IST

कृषिपंपांना उच्चदाब वीज वितरण प्रणालीमार्फत वीजजोडणी देण्याच्या योजनेस जिल्ह्यात प्रारंभ झाला आहे. या योजनेतून जिल्ह्यातील पहिली वीजजोडणी नगर तालुक्यातील मठपिंप्री येथील रवींद्र राजाराम उकांडे यांना मंगळवारी देण्यात आली.

अहमदनगर : कृषिपंपांना उच्चदाब वीज वितरण प्रणालीमार्फत वीजजोडणी देण्याच्या योजनेस जिल्ह्यात प्रारंभ झाला आहे. या योजनेतून जिल्ह्यातील पहिली वीजजोडणी नगर तालुक्यातील मठपिंप्री येथील रवींद्र राजाराम उकांडे यांना मंगळवारी देण्यात आली. अहमदनगर जिल्ह्यातील जवळपास ८ हजार ७०० शेतक-यांना या योजनेच्या माध्यमातून वीजजोडणी देण्यात येणार असून यासाठी १७२ कोटी रुपयांचा निधी खर्च होणार आहे.एक किंवा दोन कृषिपंप वीजजोडणीसाठी १०, १६ किंवा २५ किलोहोल्टचे स्वतंत्र रोहित्र या योजनेतून उभाण्यात येत आहेत. परंपरागत लघुदाब वाहिनीद्वारे दिलेल्या जोडण्यांमध्ये वाहिन्यांची लांबी वाढून गळती वाढणे, आकडे टाकून वीजचोरीस वाव या बाबी टाळता येणार आहेत. योजनेतून उच्चदाब वाहिनीद्वारे थेट वीज पुरवठा केल्याने गळतीच्या प्रमाणात घट व या प्रणालीत आकडे टाकता येणार नसल्याने वीजचोरीला आपसूकच आळा बसेल. एका रोहित्रावर किमान एक व कमाल तीन वीज जोडण्या देण्यात येणार असल्याने रोहित्र नादुरुस्त होण्याच्या तक्रारी दूर होऊन पुरेशा दाबाने वीज पुरवठा होण्यास मदत मिळेल.आॅक्टोबर-२०११ मध्ये पैसे भरून जोडणी प्रलंबित असलेल्या रवींद्र उकांडे यांना मुख्य अभियंता ब्रिजपालसिंह जनवीर यांच्या मार्गदर्शनाखाली अधीक्षक अभियंता संतोष सांगळे यांच्या हस्ते वीजजोडणी देण्यात आली. १६ किलोव्होल्ट क्षमतेच्या रोहित्रावरून साडेसात हॉर्सपॉवरच्या कृषिपंपाला ही जोडणी देऊन जिल्यात योजनेचा शुभारंभ झाला. यावेळी अहमदनगर ग्रामीण विभागाचे कार्यकारी अभियंता नितीन धर्माधिकारी, उपकार्यकारी अभियंता किसन कोपनर, सहायक अभियंता केतन देवरे, सरपंच तुळसाबाई जगताप, उपसरपंच अंकुश नवसूपे, कैलास वाळके, युवराज नवसूपे, रवींद्र उकांडे यांच्यासह महावितरणचे अधिकारी, कर्मचारी आणि शेतकरी यावेळी उपस्थित होते.महावितरणकडून राबविण्यात येत असलेल्या या योजनेतून शेतक-यांना मोठा फायदा होणार आहे. पुरेशा दाबाने तसेच ठरलेल्या कालावधीत सलग वीज मिळू शकेल. रोहित्र व वीजपंप जळण्याच्या कटकटीतुन सुटका होईल. - रवींद्र राजाराम उकांडे, शेतकरी, मठपिंप्री

 

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर