शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

भीषण अपघातात पती-पत्नी ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2019 13:05 IST

श्रीरामपूर-नेवासा मार्गावर खोकर फाटानजीक गुरुवारी सायंकाळी सहाच्या सुमारास टेम्पो आणि मोटारसायकलच्या अपघातात भोकर येथील रामकृष्ण भोईटे व त्यांच्या पत्नी रोहिणी यांचा मृत्यू झाला.

श्रीरामपूर : श्रीरामपूर-नेवासा मार्गावर खोकर फाटानजीक गुरुवारी सायंकाळी सहाच्या सुमारास टेम्पो आणि मोटारसायकलच्या अपघातात भोकर येथील रामकृष्ण भोईटे व त्यांच्या पत्नी रोहिणी यांचा मृत्यू झाला. या तरुण पती-पत्नीच्या मृत्यूमुळे परिसरावर शोककळा पसरली.नाशिक जिल्ह्यातील भगूर येथील संतोष निवृत्ती इर्षे हे नातेवाईकांच्या लग्नाकरिता कुटुंबीयांसह (एमएच १५ बीजे ४७२८) छोट्या टेम्पोतून नेवासेच्या दिशेने चालले होते. त्याच वेळी भोईटे हे खरेदीसाठी श्रीरामपूरकडे निघाले होते. दोन्ही वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले. जखमी भोईटे यांना प्रथम येथील साखर कामगार रुग्णालय व नंतर लोणी येथील प्रवरा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. रात्री दहाच्या दरम्यान त्यांची प्राणज्योत मावळली. पत्नी रोहिणी यांचा पहाटे उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघातात निर्मला विठ्ठल कोतकर, टेम्पो चालक संतोष इर्षे, मालन दौलत लकारिया हे किरकोळ जखमी झाले. त्यांच्यावर प्रवरा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मयत भोईटे यांच्या मागे आई-वडील, मुलगा व मुलगी असा परिवार आहे. त्यांचा लोकसंपर्क होता. त्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrirampurश्रीरामपूर