शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

देवळालीजवळील अपघातात पती-पत्नी ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2020 19:56 IST

राहुरी : तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे श्रीरामपूर-राहुरी फॅक्टरी रोडवर मोटरसायकल व चारचाकी वाहनाचा अपघात होऊन पती-पत्नी दोघेजण जागीच ठार झाले. घटना गुरुवारी (दि. ३०) सायंकाळी घडली आहे. या घटनेबाबत राहुरी पोलिसांत उशीरा पर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. भारत शंकर वाघापुरे (वय ६०) आणि अनिता भारत वाघापूरे (वय ५५, राहणार देवळाली प्रवरा, खटकळी) अशी मृतांची नावे आहेत. 

लोकमत न्यूज नेटवर्कराहुरी : तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे श्रीरामपूर-राहुरी फॅक्टरी रोडवर मोटरसायकल व चारचाकी वाहनाचा अपघात होऊन पती-पत्नी दोघेजण जागीच ठार झाले. घटना गुरुवारी (दि. ३०) सायंकाळी घडली आहे. या घटनेबाबत राहुरी पोलिसांत उशीरा पर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. भारत शंकर वाघापुरे (वय ६०) आणि अनिता भारत वाघापूरे (वय ५५, राहणार देवळाली प्रवरा, खटकळी) अशी मृतांची नावे आहेत. देवळाली प्रवरा येथील खटकळी येथील रहिवासी असलेले पती-पत्नी गुरुवारी सायंकाळी साडेचार वाजे दरम्यान बजाज एम एटी (क्रमांक एम. एच. १७ एच. ६२०) या दुचाकीवर बसून राहुरी फॅक्टरी येथे दवाखान्यात जात होते. इरिगेशन बंगल्या समोर चारचाकी वाहन (क्रमांक एम. एच. १७ डी. एक्स. ९७९७) या चारचाकी वाहनाने त्यांना समोरून जोराची धडक दिली. या धडकेने ते १०० फूट लांब फेकले गेले आणि जागेवरच ठार झाले आहेत. तर मोटरसायकलचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक लोकांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य केले.  हे पती-पत्नींना राहुरी येथील ग्रामीण रूग्णालयात आणले. यावेळी सहाय्यक वैद्यकीय अधिकारी संदिप आठरे यांनी तपासणी केली. मात्र नेहमी प्रमाणे ग्रामीण रूग्णालयात कोणत्याही प्रकारची सुविधा नसल्याने अपघात झालेल्या पती-पत्नीचा इसीजी काढता आला नाही. त्यामुळे सदर अपघात झालेले दोघे मृत आहेत की जिवंत आहेत, याची माहिती सहाय्यक वैद्यकीय अधिकारी संदिप आठरे यांनी दिली नाही. शहरातील इतर दवाखाने बंद असल्याने उशीरापर्यंत इसीजी करता आला नाही. बराच वेळ मृतदेह ग्रामीण रूग्णालया समोर अ‍ॅम्बूलन्समध्ये पडून होते. यावेळी त्यांच्या मुलांनी व नातेवाईकांनी मोठा हंबरडा फोडला. यामुळे पुन्हा एकदा राहुरी ग्रामीण रूग्णालयाचा कारभार समोर आला आहे.--फोटो- अपघातात ठार झालेल्या पती-पत्नींचे मृतदेह रुग्णवाहिकेमध्येच होते. मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यासही वेळ लागल्याने नातेवाईकांना ताटकळत बसावे लागले.