शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

शिकारी यहाँ शिकार हो गया! : कोंबड्यांच्या खुराड्यात बिबट्या कैद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 15:57 IST

संगमनेर तालुक्यातील येथील आश्वी बुद्रुक शिवारातील चतुरेवस्तीवरील एका शेतक-याच्या शेतातील कोंबड्याच्या खुराड्यात घुसून कोंबड्यावर हल्ला करणारा सैराट बिबट्या अखेर शुक्रवारी सकाळी पहाटे चार वाजता रात्री खुराड्यात जेरबंद  झाला आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कआश्वी : संगमनेर तालुक्यातील येथील आश्वी बुद्रुक शिवारातील चतुरेवस्तीवरील एका शेतक-याच्या शेतातील कोंबड्याच्या खुराड्यात घुसून कोंबड्यावर हल्ला करणारा सैराट बिबट्या अखेर शुक्रवारी सकाळी पहाटे चार वाजता खुराड्यात जेरबंद  झाला आहे. आश्वी परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याने धुमाकूळ घातला होता. मंगळवारी रात्री प्रतापपूर शिवारात मोटरसायकलवर हल्ला करून मायलेकीला जखमी केल्याने या घटनेने परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे वनखात्याने परिसरात पिंजरा लावला. मात्र बिबट्याने दोन दिवसांपासून हुलकावणी देत आश्वी बुद्रुक येथील चतुरे वस्तीकडे आपला मोर्चा वळवत गुरुवारी रात्री संदीप जगन्नाथ चतुरे व सुभाष भिकाजी चतुरे यांच्या गट नंबर ११८ मध्ये असलेल्या मुक्त गोठ्यात प्रवेश करीत गायींवर हल्ला चढवला, मात्रं गायींनी प्रतिकार करण्यास सुरुवात केल्याने बिबट्या सैरभैर झाला. यानंतर बिबट्याने गोठ्यात असलेल्या कोंबड्याच्या खुराड्यात घुसून कोंबड्या फस्त करण्यास सुरुवात केली. पहाटे एक-दीड वाजण्याच्या खुराड्याचा दरवाजा अचानक बंद झाल्याने बिबट्या खुराड्यात अडकला होता. गायांचे हंबरणे ऐकूण चतुरे कुटुंबाला जाग आली. घरातून बाहेर येताच खुराड्याकडे लक्ष गेले असता बिबट्या कोबड्याच्या खुराड्यात हैदोस घालताना दिसला. त्याने तोपर्यंत जवळपास २५ कोबड्या फस्त केल्याचे निदर्शनास आल्याने चतुरे यांनी तात्काळ वनविभागाला माहिती दिली.            माहिती मिळताच वनविभागाच्या अधिका-यांनी चतुरे याच्या वस्तीकडे धाव घेत खुराड्यात अडकलेल्या बिबट्याला भूलीचे इंजेक्शन देत बेशुद्ध करीत ताब्यात घेतले असून जोर्वे येथील नर्सरीत हलवण्यात आले आहे. तर मंगळवारी रात्री प्रतापपूर शिवारात मोटरसायकलवर हल्ला करून मायलेकीला जखमी करणारा हाच बिबट्या असण्याची शक्यता वनविभागाकडून वर्तवली असून बिबट्या दहा वर्ष वयाचा व  नव्वद किलो वजनाचा व नर जातीचा असल्याचे सांगितले. बिबट्या पकडला गेल्याने परिसरातील ग्रामंस्थानी सुटकेचा निश्वास सोडला आहे.