शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

सौंदाळे येथील मुलीचा असा करण्यात आला खून, शवविच्छेदन अहवालातून पुष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 18:06 IST

नेवासा (जि. अहमदनगर) : तालुक्यातील सौंदाळा येथील वैष्णवी सोमनाथ आरगडे या अल्पवयीन मुलीचा गळा दाबल्याने गुदमरून मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झाले आहे. नेवासे पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात इसमाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. 

नेवासा (जि. अहमदनगर) : तालुक्यातील सौंदाळा येथील वैष्णवी सोमनाथ आरगडे या अल्पवयीन मुलीचा गळा दाबल्याने गुदमरून मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झाले आहे. नेवासे पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात इसमाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. हवालदार भीमराव पवार यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. नेवासे फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात वैष्णवी आरगडे (वय ९) हिला उपचारासाठी सोमवारी नेण्यात आले होते. मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. नेवासे पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला होता. मयत वैष्णवी हिचा चुलता कानिफनाथ विठ्ठल आरगडे यांनी सर्पदंशाने तिचा मृत्यू झाल्याचा दावा केला होता. मात्र ग्रामीण रुग्णालयाच्या वैैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत्यूबाबत संशय व्यक्त केला. पोलीस उपनिरीक्षक भरत दाते यांनी पंचनामा केल्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या आदेशावरून मृतदेह शवविच्छेदनासाठी नगर येथील जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला होता. तेथील डॉक्टरांनी दिलेल्या शवविच्छेदन अहवालात वैैष्णवी हिचा मृत्यू श्वसनलिकेवर दबाव आल्याने व श्वास गुदमरून मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले होते.त्यानंतर प्रकरणाला वेगळे वळण मिळाले. नेवासा पोलिसांनी अज्ञात व्यक्तिविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. २० ते २१ जून दरम्यान रात्री अज्ञात इसमाने श्वास दाबून वैैष्णवी हिचा खून केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. जिल्हा पोलीस प्रमुख अखिलेश कुमार सिंग यांनी रविवारी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.अतिरिक्त पोलीस अधीक्षक दीपाली काळे, शेवगाव विभागाचे उपअधीक्षक मंदार जवळे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक रणजित डेरे,उपनिरीक्षक भरत दाते प्रकरणाची चौकशी करत आहेत. मयत वैष्णवीच्या जवळील नातेवाइकांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. पोलीस निरीक्षक रणजित डेरे तपास करत आहेत.