शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
2
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
3
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांना आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी, अटीशर्तीही घातल्या
4
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
5
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
6
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
7
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
8
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?
9
'डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल अन् PM मोदींनी ५ तासात युद्ध थांबवले', राहुल गांधींची बोचरी टीका
10
नागपूर: 'चॅट जीपीटी'च्या मदतीने पोलिसांनी पकडला मास्टरमाईंड; पुण्यातील व्यक्तीच्या घरावर घेतलं कर्ज, ५ कोटींचा गंडा
11
Ganesh Chaturthi 2025: मराठी कलाकारांच्या घरी झाले बाप्पाचे आगमन, पाहा फोटो
12
जैशला पुनरुज्जीवित करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न; मसूदच्या दहशतवाद्यांसाठी काय करतंय पाक सरकार?
13
अभिनेतापासून राजकारणी बनलेल्या थलापती विजय वादात! TVK रॅलीत बाउन्सरने कार्यकर्त्यांना व्यासपीठावरुन खाली फेकले, गुन्हा दाखल, व्हिडीओ व्हायरल
14
"ज्यांनी बिहारींना शिवीगाळ केली, त्यांना..."; भाजपाचा काँग्रेस खासदार राहुल गांधींवर हल्लाबोल
15
गुजरातमध्ये निनावी पक्षांना ₹४३०० कोटींची देणगी..; राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल
16
Ganesh Visarjan 2025: बाप्पा दीड दिवसांतच का चालला? असं चिमुकल्यांनी विचारलं, तर द्या 'हे' शास्त्रोक्त उत्तर!
17
ग्रीन टी की ब्लॅक टी... वजन कमी करण्यापासून ते हृदयाच्या आरोग्यासाठी, जास्त फायदेशीर काय?
18
५५ वर्षांची आई आणि १७ मुले! हे कुटुंब कसं चालवतंय आपला उदरनिर्वाह?
19
जम्मू-काश्मीरमध्ये जोरदार पाऊस; भारताने पुन्हा दाखवली माणुसकी, पाकिस्तानला दिला मोठा इशारा!
20
गोविंदाने पत्नी सुनीतासोबत साजरी केली गणेश चतुर्थी, घटस्फोटांच्या अफवांना लावला पूर्णविराम

४८ हजार ७९९ शेतक-यांना हवे कांदा अनुदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2019 10:47 IST

राज्य सरकारने १ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर २०१८ दरम्यान बाजार समित्यांमध्ये विकलेल्या कांद्यास प्रति क्विंटल २०० रूपये अनुदान जाहीर केले आहे.

अहमदनगर : राज्य सरकारने १ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर २०१८ दरम्यान बाजार समित्यांमध्ये विकलेल्या कांद्यास प्रति क्विंटल २०० रूपये अनुदान जाहीर केले आहे. जास्तीत जास्त २०० क्विंटल मर्यादेपर्यंत हे अनुदान मिळणार आहे. यासाठी १५ जानेवारीपर्यंत शेतक-यांकडून अर्ज मागविण्यात आले होते. त्यानुसार १५ जानेवारीपर्यंत अहमदनगर जिल्ह्यातील ४८ हजार ७९९ शेतकºयांनी अनुदान मिळण्यासाठी अर्ज केल्याचे जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांनी सांगितले.कांदा अनुदान मिळण्यासाठी जिल्ह्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये अर्ज स्वीकारले जात आहेत. १ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर ज्या शेतक-यांनी बाजार समित्यांमध्ये कांदा विकलेला आहे, अशा शेतक-यांना सरकारने प्रतिक्विंटल २०० रूपयांप्रमाणे जास्तीत जास्त २०० क्विंटलपर्यंत कांद्यास अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे.अर्जांची छाननी सुरूकृषी उत्पन्न बाजार समित्यांकडील माहितीनुसार मुदतीत २०० क्विंटल मर्यादेत कांदा विक्रीसाठी आणलेल्या शेतक-यांची अंदाजे संख्या १ लाख ६६ हजार ४२७ आहे. १५ जानेवारीपर्यंत ४८ हजार ७९९ अर्ज प्राप्त झाले आहेत. तालुकास्तरीय समितीने आतापर्यंत ५ हजार ५४९ अर्जांची तपासणी केली असून ५ हजार ५४७ अर्ज पात्र ठरले आहेत. त्याद्वारे ९५ हजार ७७ क्विंटल कांदा बाजार समितीत विकण्यात आला आहे. इतर अर्जांची छाननी सुरू आहे.

कांदा अनुदानासाठी शेतक-यांना अर्ज सादर करण्यास १५ जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आली होती. अनुदानापासून पात्र शेतकरी वंचित राहू, नयेत म्हणून राज्य सरकारने अर्ज सादर करण्यासाठी २५ जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे राहिलेल्या शेतकºयांनी या मुदतवाढीचा लाभ घेऊन जवळच्या २बाजार समितीशी संपर्क साधून अर्ज सादर करावेत.- दिग्विजय आहेर, जिल्हा उपनिबंधक, अहमदनगर.तालुकानिहाय स्थितीतालुका                  प्राप्त अर्ज          पात्र अर्ज              कांदा वजननगर.................... १५६५८......छाननी सुरू................ छाननी सुरूसंगमनेर............... ३२७३....... १९५६..................... ८६९९२अकोले............... १०७......... ३०........................ ४९०पारनेर................ २३८५....... १३७...................... ४९८७श्रीगोंदा.............. १३५......... १३५...................... २२९१कर्जत................ २४२......... छाननी सुरू.............. छाननी सुरूजामखेड............. ६५०......... छाननी सुरू.............. छाननी सुरूपाथर्डी.................. ४८५........ १७........................ ३१७शेवगाव................ ११४८..... ८८....................... छाननी सुरूनेवासा.................. १०४९७..... १८९१.................... छाननी सुरूराहुरी................... ९१२५...... ३४३..................... छाननी सुरूश्रीरामपूर ............. २३८२..... ८५०....................... छाननी सुरूराहाता................ १४५५..... १००........................ छाननी सुरूकोपरगाव ........... १०३८...... छाननी सुरू............... छाननी सुरूप्रसन्न कृषी मार्केट... २१९........ छाननी सुरू.................. छाननी सुरूएकूण................... ४८७९९... ५५४७.................. ९५०७७

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर