शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमणाबाबत ‘बांधकाम’चे कागदी घोडे

By admin | Updated: April 27, 2016 23:55 IST

अरुण वाघमोडे, अहमदनगर बांधकाम विभागाच्या जागतिक बँक प्रकल्प कार्यालयामार्फत शहरातून जाणाऱ्या महामार्गावरील ४०० पेक्षा जास्त अतिक्रमणधारकांना नोटीस बजावण्यात आली आहे़

अरुण वाघमोडे, अहमदनगरबांधकाम विभागाच्या जागतिक बँक प्रकल्प कार्यालयामार्फत शहरातून जाणाऱ्या महामार्गावरील ४०० पेक्षा जास्त अतिक्रमणधारकांना नोटीस बजावण्यात आली आहे़ अतिक्रमणधारकांनी मात्र, या नोटिसीला केराची टोपली दाखवत दुर्लक्ष केले आहे़ बांधकाम विभागाने नोटिशीपलीकडे पुढे काहीच कार्यवाही न करता फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार केला असल्याचे स्पष्ट होत आहे़ नगर- मनमाड व नगर-औरंगाबाद हे दोन महामार्ग जागतिक बँक प्रकल्प उपविभागांतर्गत येतात़ या दोन्ही महामार्गांवर रस्त्यापासून १५ मीटरच्या आत मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झालेली आहेत़ बांधकाम विभागाने नगर-मनमाड रस्त्यावरील नगर ते कोल्हारपर्यंत तर नगर-औरंगाबद रस्त्यावरील नगर ते घोडेगावपर्यंतच्या व्यावसायिकांना नोटिसा बजावून सात दिवसांच्या आत स्वत:हून अतिक्रमण काढून टाकावीत, असे सांगितले आहे़ व्यावसायिकांना नोटीस देऊन महिना उलटला तरी एकाही व्यावसायिकाने स्वत:हून अतिक्रमण काढलेले नाही़ वर्षाभरापूर्वीही बांधकाम विभागाने अशाच नोटिसा बजावल्या होत्या़ त्यावेळी एकही अतिक्रमण हटले नाही तर ज्यांनी अतिक्रमण काढले होते, त्यांनी पुन्हा तेथे व्यवसाय सुरू केला़ बांधकाम विभागाने मात्र, ठोस अशी काहीच कारवाई केली नाही. त्यामुळे अतिक्रमणाबाबत फक्त कागदे रंगविण्याचा प्रकार होत असल्याचे स्पष्ट होते़ नगर-मनमाड महामार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्यात आला असून, हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे वर्ग करण्यात येणार आहे़