शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

वादळी पावसामुळे घरांची पडझड, अनेक झाडेही कोसळली; अर्ध्या कोपरगाव तालुक्याला झोडपले!

By सचिन धर्मापुरीकर | Updated: June 12, 2024 15:50 IST

कांदाचाळींचेही नुकसान

सचिन धर्मापुरीकर, लोकमत न्यूज नेटवर्क, कोपरगाव (जि. अहमदनगर) : अर्ध्या कोपरगाव तालुक्याला मंगळवारी सायंकाळी वादळी पावसाने झोडपून काढले. अनेक घरांची पडझड झाली असून कांदाचाळींचे नुकसान झाले आहे. वेगवेगळ्या गावांमध्ये मोठमोठी वृक्ष मुळासकट उन्मळून पडली आहेत. तालुक्यात कुठेही जीवितहानी झालेली नाही.

मृग नक्षत्रावर पाऊस होत असल्याने एकीकडे समाधानाचे वातावरण असतानाच दुसरीकडे घरांची पत्रे उडून जाने, झाडे पडणे, विजेचे खांब वाकणे अशा घटना घडत आहेत. कोळपेवाडी, सुरेगाव, कोळगावथडी, माहेगाव देशमुख, वारी, रवंदे, कोकमठाण व पोहेगाव आदी भागात मंगळवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला.

या पावसात सुरेगाव येथील दिनेश बोरा यांचे कांद्याचे शेड पूर्णपणे पडले. याच गावातील शैलेंद्र वाबळे यांच्या घराची पत्रे उडून गेल्याने नुकसान झाले आहे. मौजे कोळगाव थडी येथील दगू निंबाळकर व भागवत निंबाळकर यांच्या घराशेजारी असलेले मोठे पिंपळाचे झाड घरावर पडून घराचे नुकसान झाले आहे. यात सुदैवाने कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. कोळगाव थडी येथेच संजय यशवंत शेलार यांच्याही घरावरील पत्रे उडाली. वारी येथे पंडित रंभाजी चव्हाण यांच्या घराचा धाबा पडला आहे.

सर्वाधिक पाऊस सुरेगाव मंडळात

कोपरगाव तालुक्यात मंगळवारी रात्री मंडळनिहाय झालेल्या पावसाची बुधवारी सकाळी झालेली नोंद पुढील प्रमाणे. कोपरगाव- ३.८ मिमी, रवंदे - २७ मिमी, दहेगाव बोलका २.३ मिमी, पोहेगाव २५.३ तर सुरेगाव मंडळात ३७ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. पावसामुळे कुठेही जीवितहानी झाली नसल्याचे नायब तहसीलदार चंद्रशेखर कुलथे यांनी सांगितले.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर