अहमदनगर : जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडील घरकु लाच्या प्रतीक्षा यादीत नावे नसणाऱ्या कु टुंबांना इंदिरा आवास योजनेतील घरकु ल योजनेचा लाभ देण्यात येत नव्हता. मात्र, २००२ च्या दारिद्य्ररेषेच्या यादीत नावे असणाऱ्या कुटुंबांना घरकुल योजनेचा लाभ देण्याचा निर्णय जिल्हा परिषद प्रशासनाने घेतला आहे. घरकुलाचा लाभ मिळणाऱ्यांमध्ये ४ हजारांच्या जवळपास अनुसूचित जाती-जमातीची आणि अल्पसंख्याक समाजातील कुटुंबे आहेत.इंदिरा आवास योजनेचा लाभ देण्यासाठी गावनिहाय प्रतीक्षा यादी तयार करण्यात आलेली होती. त्या प्रतीक्षा यादीनूसार अनुसूचित जाती-जमातीची आणि अल्पसंख्याक कुटुंबांतील व्यक्तींना घरकुल योजनेचा लाभ देण्यात येत होता. मात्र, आता २००२ च्या दारिद्य्ररेषेच्या यादीत नावे असणाऱ्या कुटुंबांना घरकुल योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.
दारिद्य्ररेषेखालील कुटुंबांना घरकु ल
By admin | Updated: March 1, 2016 23:32 IST