शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

मंगळवारपासून आजारी व्यक्तींच्या तपासणीसाठी घरोघरी सर्वेक्षण  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2020 16:16 IST

अहमदनगर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ मोहिम प्रत्येक जिल्ह्यात राबविण्याचे ठरविले आहे. जिल्ह्यात मंगळवार (दि. १५)पासून या मोहिमेचा प्रारंभ होणार आहे. या मोहिमेत कोरोनादुतांनी घरोघरी सर्वेक्षण करुन प्रत्येक कुटुंबातील सर्व सदस्यांची आरोग्य विषयक माहिती संकलित करावी. आजारी तसेच लक्षणे असणाºया रुग्णांवर तात्काळ उपचार करावेत. पहिल्या टप्प्यातील ही मोहिम २५ सप्टेंबरपर्यंत सुरु राहणार आहे, अशी माहिती पालकमंत्री हसन मुश्रिफ यांनी आॅनलाईन आढावा बैठकीत दिली.

अहमदनगर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ मोहिम प्रत्येक जिल्ह्यात राबविण्याचे ठरविले आहे. जिल्ह्यात मंगळवार (दि. १५)पासून या मोहिमेचा प्रारंभ होणार आहे. या मोहिमेत कोरोनादुतांनी घरोघरी सर्वेक्षण करुन प्रत्येक कुटुंबातील सर्व सदस्यांची आरोग्य विषयक माहिती संकलित करावी. आजारी तसेच लक्षणे असणाºया रुग्णांवर तात्काळ उपचार करावेत. पहिल्या टप्प्यातील ही मोहिम २५ सप्टेंबरपर्यंत सुरु राहणार आहे, अशी माहिती पालकमंत्री हसन मुश्रिफ यांनी आॅनलाईन आढावा बैठकीत दिली.

जिल्ह्यात मंगळवारपासून (दि. १५ ) ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ अभियानास प्रारंभ होत आहे. त्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री मुश्रीफ यांनी व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे प्रशासनाशी संवाद साधला आणि मोहिमेच्या अंमलबजावणीबाबत सूचना दिल्या. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, महानगरपालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, छावणी परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विद्याधर पवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे आदींसह प्रमुख अधिकारी सहभागी झाले होते.यावेळी पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले, जिल्ह्यातील लोकसंख्येचे प्रमाण लक्षात घेता महानगरपालिका, ग्रामीण भाग, नगरपालिका क्षेत्र आणि छावणी परिषद क्षेत्रात आरोग्य पथकांची स्थापना करुन सर्वेक्षण करण्यात येईल. यामध्ये सहभागी कोरोनादूत घरोघरी जाऊन नागरिकांची आरोग्यविषयक माहिती घेणार आहेत. ही मोहीम दोन टप्प्यात होणार आहे. पहिल्या फेरीचा कालावधी १५ दिवसांचा असेल तर दुसºया फेरीचा कालावधी १० दिवसांचा राहणार आहे.   जिल्हाधिकारी द्विवेदी म्हणाले, प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा या मोहिमेसाठी सज्ज झाली आहे. या मोहिमेमुळे प्रशासनाच्या कोरोना प्रादुर्भाव रोखण्याच्या कामाला अधिक गती मिळणार आहे. ---असे असेल पथकजिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सांगळे यांनी मोहिमेची अंमलबजावणी आणि तयारीबाबत माहिती दिली. या मोहिमेअंतर्गत गृहभेटीसाठी एक आरोग्य कर्मचारी आणि २ स्वयंसेवक (एक पुरुष व एक स्त्री) असे तिघांचे पथक असेल. एक पथक १ दिवसात ५० घरांना भेटी देईल. पहिली फेरी १५ दिवस असे गृहीत धरुन संपूर्ण लोकसंख्येसाठी एकूण पथकांची संख्या निश्चित करण्यात येणार आहे. --- 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरcorona virusकोरोना वायरस बातम्या