शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
6
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
7
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
8
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
9
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
10
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
11
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
12
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
13
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
14
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
15
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
16
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
17
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
18
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
19
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
20
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज

खडीक्रशरच्या ब्लास्टींगमुळे घरांना तडे; सरपंचाला जीवे मारण्याची धमकी

By admin | Updated: May 17, 2017 16:49 IST

उक्कडगाव येथील खडीक्रशरच्या ब्लास्टींगमुळे अनेक घरांना तडे गेले असून, हे खडी क्रशर बंद करण्यासाठी शासनदरबारी उंबरठे झिजवणाऱ्या सरपंचालाही जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे़

आॅनलाईन लोकमतअन्सार शेखचिचोंडी पाटील, दि़ १७ - नगर तालुक्यातील उक्कडगाव येथील खडीक्रशरच्या ब्लास्टींगमुळे अनेक घरांना तडे गेले असून, हे खडी क्रशर बंद करण्यासाठी शासनदरबारी उंबरठे झिजवणाऱ्या सरपंचालाही जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे़ विशेष म्हणजे २०११ साली दिलेला ‘ना हरकत’ दाखला ग्राह्य धरुन प्रशासनाने या खडी क्रशरला २०१६ मध्ये गौण खनिज उत्खननाचा आणि खडीक्रशिंगचा परवाना दिल्याची बाब उघड झाली आहे़उक्कडगाव येथे २०११ साली खडीक्रशर सुरु करण्यात आले़ त्यावेळी ग्रामपंचायतीने खडीक्रशरसाठी ‘ना हरकत’ दाखला दिला होता़ मात्र, त्यानंतर या खडीक्रशरचे दुष्परिणाम गावाला भोगावे लागले़ त्यामुळे खडीक्रशरविरोधात गावकरी एक झाले़ त्यामुळे हे खडीक्रशर बंद करावे, या मागणीसाठी २०१२ ते २०१६ या कालावधीत ग्रामसभेत तीन वेळा ठराव मंजूर करुन ते जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदारांकडे पाठविण्यात आले. मात्र अधिकाऱ्यांनी ग्रामसभेच्या ठरावास केराची टोपली दाखवली. त्यामुळे पाच वर्षांपासून हे खडीक्रशर बिनदिक्कत सुरु आहे. या खडीक्रशरचा परवाना नुतनीकरणास गावकऱ्यांचा विरोध असताना २०११ सालचा जुना ‘ना हरकत’ दाखला अधिकाऱ्यांनी ग्राह्य धरुन सन २०१६ मध्ये या खडीक्रशरला परवानगी दिली. सन २०१६ मध्ये खडीक्रशर चालकाने परवानगीसाठी अर्ज दाखल केला. व त्यास पाच वर्षापूर्वीचा ग्रामपंचायतीचा संमती अर्ज जोडून परवानगी दिली. खडीक्रशरसाठी वीस फुटापर्यंत परवानगी असताना सुमारे ८० फुटापर्यंत अनाधिकृत उत्खनन करण्यात आले. या अनधिकृत उत्खननाबाबत ग्रामपंचायतीने अधिकाऱ्यांकडे तक्रारही केली. मात्र यावर कोणतीही कारवाई झाली नाही. उत्खननासाठी होणाऱ्या ब्लास्टने परिसरातील विहिरींचे नुकसान झाले आहे तर काहींच्या घरांना तडे गेले आहेत. तसेच खडी वाहतूक होणाऱ्या मार्गालगत जिल्हा परिषद शाळा असल्याने वाहनांचा कर्कश आवाज व भरधाव वाहनांमुळे लहान मुलांच्या जिवितास धोका निर्माण झाला आहे.या खाणीच्या परिघ क्षेत्रामध्ये ६०० मीटर अंतराच्या आतमध्ये वस्त्या आहेत. त्यामुळे येथील नागरिकांना या खडी क्रशरचा मोठ्या प्रमाणावर त्रास होतो. हे खडीक्रशर बंद करावे, यासाठी ग्रामपंचायत २०१२ पासून पाठपुरावा करीत आहे़ मात्र, अधिकाऱ्यांनी अद्याप कार्यवाही केली नाही़ मात्र, खडीक्रशर चालकांकडून जीवे मारण्याची धमकी मिळाल्याची माहिती उक्कडगावचे सरपंच नवनाथ म्हस्के यांनी ‘लोकमत’ला दिली़