अकोले : तालुक्यातील कळस बुद्रुक येथील ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय वाकचौरे, पांडुरंग वाकचौरे व प्रवीण वाकचौरे यांच्या घराला रविवारी सकाळी ९ वाजण्याच्या दरम्यान शार्टसर्किटमुळे भीषण आग लागली. आगीत सर्व संसारोपयोगी वस्तू खाक झाल्या.
या आगीचा प्रचंड वेग असल्याने काही क्षणातच आगीने उग्ररूप धारण केले होते. तातडीने अगस्ती कारखान्याच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले होते. ग्रामस्थांच्या सहकार्याने आग आटोक्यात आणण्यात यश मिळाले. घर जुन्या सागवान लाकडाचे असल्यामुळे लाखोंचे रुपयांचे नुकसान झाले आहे. महावितरणचे अभियंता श्रीराम व तलाठी प्रमोद शिंदे यांनी घटनेचा पंचनामा केला आहे.
विनय वाकचौरे, राजेंद्र गवांदे, ज्ञानेश्वर वाकचौरे, अरूण वाकचौरे, जालिंदर वाकचौरे, सागर वाकचौरे, गोरख वाकचौरे, सोमनाथ कवडे, राहुल वाकचौरे, नामदेव निसाळ, प्रकाश बिबवे, संजय नवले, प्रवीण वाकचौरे, नितीन वाकचौरे, सुदाम वाकचौरे, पुरूषोत्तम सरमाडे, बाबाजी भुसारी, अर्जुन भुसारी, शरद दातखिळे यांनी आग आटोक्यात आणण्यास मदत केली.