शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

चारित्र्याच्या संशयावरून श्रीगोंदा येथील विवाहितेला गरम सळईचे चटके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 20:49 IST

विवाहितेला लोखंडी सळईने पायाला चटके देऊन जखमी केल्याची घटना श्रीगोंदा शहरात घडली. याप्रकरणी श्रीगोंदा पोलिसांनी विवाहितेचा पती कांतिलाल पोटे, सासू कमल पोटे या दोघांविरुद्ध मंगळवारी गुन्हा दाखल केला आहे.

श्रीगोंदा : धुणे धुण्यासाठी गेल्यानंतर मुलासोबत का बोलली? या कारणावरून विवाहितेला लोखंडी सळईने पायाला चटके देऊन जखमी केल्याची घटना श्रीगोंदा शहरात घडली. याप्रकरणी श्रीगोंदा पोलिसांनी विवाहितेचा पती कांतिलाल पोटे, सासू कमल पोटे या दोघांविरुद्ध मंगळवारी गुन्हा दाखल केला आहे.ही घटना २० मार्च रोजी सायंकाळी पाच वाजता श्रीगोंदा शहरातील बाबुर्डी रस्ता परिसरात घडली. या प्रकरणी कोमल पोटे या विवाहितेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, घराच्या बाजूला असलेल्या चारीवर धुणे धुण्यासाठी गेले होते. यावेळी बाजूच्या मुलासोबत का बोलली? असा सवाल करून पती कांतिलाल याने शिवीगाळ केली. पतीसह सासू कमल या दोघांनी मारहाण केली. पतीने लोखंडी सळई गरम करून पाय, मांडीवर चटके दिले. सळई पोळल्याने पायाला गंभीर दुखापत झाली. या मारहाणीबाबत कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. घरात कोंडून दरवाजा बाहेरून लावून घेतला. तब्बल दोन तासांनी दरवाजा उघडल्यानंतर जीव वाचवत पळून गेले. बाजूलाच असलेल्या रेल्वे गोदामात एक रात्र व एक दिवस थांबून माहेरी बेलवंडी कोठार येथे आई-वडिलांकडे गेले. त्यानंतर सहा-सात दिवसांनी फिर्याद दाखल केली. दरम्यान विवाहितेच्या फिर्यादिवरून गंभीर दुखापत केल्याप्रकरणी श्रीगोंदा पोलिसांनी विवाहितेचा पती कांतिलाल पोटे, सासू कमल पोटे या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार करीत आहेत.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrigondaश्रीगोंदा