शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
"एवढ्या मोठ्या शुल्कवाढीने..."; ट्रम्प यांनी फोडला H-1B व्हिसा बॉम्ब, भारतानं व्यक्त केली मोठी चिंता!
3
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
4
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
5
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
6
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
7
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
8
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
9
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
10
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
11
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
12
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
13
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
14
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
15
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
16
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
17
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
18
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
19
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
20
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल

हॉस्पिटलकडून अडवणूक; भरपाईचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2019 15:33 IST

वैद्यकीय उपचारासाठी राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचा लाभ घेण्यास पात्र असतानाही कागदपत्रांची पूर्तता न करता उपचाराचे रुग्णाकडून पैसे घेत अडवणूक केल्याने जिल्हा ग्राहक तक्रार निवारण

अहमदनगर: वैद्यकीय उपचारासाठी राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचा लाभ घेण्यास पात्र असतानाही कागदपत्रांची पूर्तता न करता उपचाराचे रुग्णाकडून पैसे घेत अडवणूक केल्याने जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने श्री साई सह्याद्री मल्टी स्पेशालिटी या रुग्णालयाने रुग्णास ४७ हजार ५०० रुपयांची नुकसान भरपाई द्यावी, असे आदेश दिले आहेत़ग्राहक मंचाचे अध्यक्ष व्ही़सी़ पे्रमचंदाणी, सदस्य सी़व्ही़ डोंगरे व एम़एऩ ढाके यांनी हा निकाल दिला आहे़ या प्रकरणात तक्रारदार यांच्यावतीने अ‍ॅड़ एस़एल़ असावा यांनी काम पाहिले़ नगर तालुक्यातील पोखर्डी येथील गोरक्षनाथ मुरलीधर चौरे यांचे वडील मुरलीधर केशव चौरे यांना मेंदुमध्ये रक्तस्त्राव होत असल्याने त्यांना उपचारासाठी येथील झोपडी कॅन्टीनजवळील श्री साई सह्याद्री मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये ३१ डिसेंबर २०१४ मध्ये दाखल केले़ चौरे यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने त्यांच्यावर राजीव गांधी जीवनदायी योजनेतंर्गत उपचार करावे अशी विनंती हॉस्पिटलचे डॉ़ अतुल विजयकुमार गुगळे व व्यवस्थापक राजेंद्र पुंजाजी पगार यांना केली होती़ तसेच योजनेसाठी आवश्यक असणारे कागदपत्रे चौरे यांनी हॉस्पिटलकडे दिले होते़ उपचार झाल्यानंतर हॉस्पिटलने चौरे यांचे प्रकरण राजीव गांधी योजनेकडे सादर केले नाही व त्यांच्याकडून उपचाराचा खर्च घेतला़ याबाबत गोरक्षनाथ व मुरलीधर चौरे यांनी ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे हॉस्पिटल, डॉक्टर व व्यवस्थापकाविरोधात तक्रार दाखल केली होती़ यावर सुनावणी होऊन मंचाने हॉस्पिटल, डॉ़ अतुल गुगळे व व्यवस्थापक पगार यांनी तक्रारदार चौरे यांना ४७ हजार ५०० रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत़ आदेशाच्या दिनांकापासून ३० दिवसांच्या आत नुकसान भरपाई दिली नाही तर दरसाल दर शेकडा ९ टक्के व्याज देण्याचे आदेश मंचाने दिले आहेत़हॉस्पिटलविरोधात तीन ठिकाणी तक्रारीतक्रारदार चौरे यांनी श्री साई सह्याद्री मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलविरोधात ग्राहक मंचासह राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचे जिल्हा प्रमुख यांच्याकडे तक्रार केली होती़ या तक्रारीत तथ्य आढळल्याने या हॉस्पिटलचे नाव राजीव गांधी जीवनदायी योजनेसाठी पात्र असलेल्या हॉस्पिटलच्या यादीतून वगळण्यात आले आहे़ चौरे यांनी इंडियन मेडिकल कौन्सिलकडेही तक्रार केली होती़ त्यांच्याकडे याबाबत अद्याप चौकशी सुरू आहे़

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर