शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

घोड धरण ओव्हरफ्लो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2018 12:46 IST

श्रीगोंदा, शिरूर, कर्जत तालुक्यातील ५० गावांना वरदान ठरणारे घोड धरण बुधवारी ओव्हरफ्लो झाले. ५० वर्षांमध्ये हे धरण ४१ वेळा भरले आहे.

श्रीगोंदा : श्रीगोंदा, शिरूर, कर्जत तालुक्यातील ५० गावांना वरदान ठरणारे घोड धरण बुधवारी ओव्हरफ्लो झाले. ५० वर्षांमध्ये हे धरण ४१ वेळा भरले आहे. धरणातून १० हजार ४४० क्यूसेसने पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे नदी काठच्या गावांना सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे.घोड नदीवर १९६५ च्या सुमारास ७ हजार ६३८ दशलक्ष घनफू ट क्षमतेचे मातीचा भराव असलेले २९ दरवाजे असलेले हे धरण चिंचणी येथे बांधण्यात आले. या धरणास ३२ किलोमीटर लांबी असलेला उजवा तर ८६ किलोमीटर लांबीचा डावा कालवा आहे. धरणातून १९६८ ला शेतीसाठी पहिले आवर्तन सोडण्यात आले. सन १९६८ ते २०१८ दरम्यान ५० वर्षे पूर्ण केल्याने हे धरण यावर्षी अर्ध शतक साजरे करीत आहे. यामध्ये ४१ वेळा धरण ओव्हरफ्लो झाले. यामध्ये १९७१ व १९८३ ला घोड धरणातून एक लाख क्यूसेसपेक्षा जादा पाणी घोड नदीत सोडण्यात आले. त्यामुळे काष्टी, गावठाण परिसरात राहणाऱ्या सुमारे चारशे कुटूंबांचे स्थलांतर करावे लागले होते.या धरणातील पाणी साठ्यावर तयार झालेल्या उसावर नागवडे, घोडगंगा व अंबालिका या तीन साखर कारखान्यांचे चक्र फिरले आहे. साखर उद्योगाच्या माध्यमातून या भागाच्या विकासाला दिशा मिळाली आहे. घोड धरण १०० टक्के भरल्याने लाभक्षेत्रातील शेतकºयांनी जल्लोष केला आहे.कुकडी धरण ८० टक्के भरलेकुकडी प्रकल्पातील डिंबे वडज व येडगाव धरण १०० भरले आहे. माणिकडोह ६६ टक्के, तर पिंपळगाव जोगे धरण ४७ टक्के भरले आहे. गेल्यावर्षीपेक्षा यंदा कुकडी प्रकल्पात २ टक्के जादा उपयुक्त पाणी साठा आहे.घोड नदीकाठी सावधगिरीडिंभे, येडगाव, वडज ही धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत. घोड धरणात मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे. बुधवारी सकाळी घोड धरण ओव्हरफ्लो झाले. नदीत सोडण्यात येणा-या पाण्यात वाढ करण्यात आली आहे. वरच्या भागातून जादा पाणी आले तर, घोड धरणातून आणखी पाणी सोडावे लागेल. त्यामुळे नदी काठच्या नागरिकांनी सावध रहावे, असे आवाहन शिरूरच्या घोड पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अधिकारी प्रकाश लंकेश्वर यांनी केले आहे. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrigondaश्रीगोंदा