सोनई : जागतिक महिला दिनानिमित्त सोनई (ता. नेवासा) येथील श्री संत जगनाडे महाराज मंदिरात महिला आघाडीच्या वतीने समाजातील ज्येष्ठ महिलांचा सन्मान करण्यात आला. सुजाता क्षीरसागर, प्रीती देशमाने यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी लक्ष्मीबाई जगताप, लक्ष्मीबाई खंडागळे, सुभद्राबाई क्षीरसागर, मथाबाई सुरसे, मंगलाबाई थोरात, पार्वतीबाई सुद्रिक, कचराबाई क्षीरसागर, इंदूबाई पवार यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी मनीषा शिदलबे यांचाही विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी निर्मला क्षीरसागर, अलका सुरसे, सुरेखा क्षीरसागर, अर्चना खंडागळे, आशाताई सुद्रिक, राणी सुद्रिक, सिंधू सुरसे, सुशीला सुद्रिक, अंबिका शेजवळ, राणी सुद्रिक, आशा जगताप, नलिनी थोरात, अंबिका सुरसे, मयूरी क्षीरसागर, ललिता जगताप, राजश्री जगताप, मनीषा जगताप, हीरा थोरात, जयश्री जगताप, शशिकला शेजवळ, प्रभावती सुरसे, श्यामा सोनवणे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रीती देशमाने, तर अलका सुरसे यांनी आभार मानले.
सोनई येथे ज्येष्ठ महिलांचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:20 IST