चिचोंडी पाटील : चिचोंडी पाटील (ता. नगर) ग्रामपंचायतीचा ८० वा वर्धापन दिन आजी-माजी सरपंचाच्या हस्ते केक कापून साजरा करण्यात आला. आजी-माजी सरपंचांचा सन्मान करण्यात आला असून, दिवंगत सरपंचांचे स्मरण करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी दिवंगत बाजीराव चंदनमल गांधी, स्व. नारायण रामजी जगताप, स्व. खंडेराव पर्वतराव ठोंबर, स्व. माणिकचंद गणेशमल कांकरिया, स्व. रामकिसन गोविंद खडके, स्व. यशवंत लिंबाजी पवार, स्व. खंडू केरू खराडे, स्व. रघुनाथ पंढरीनाथ हजारे, स्व. आबासाहेब नानाभाऊ खडके आदी सरपंचांचे स्मरण करून त्यांनी गावच्या विकासात दिलेल्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
त्यानंतर आजी-माजी सरपंच शंकर विठोबा पवार, पांडुरंग दत्तात्रय कोकाटे, बाजीराव भानुदास हजारे, राजाराम पंढरीनाथ हजारे, मच्छिंद्र कोंडीबा खडके, दीपक गिरधारीलाल चौधरी, अमोल धोंडीबा कोकाटे, अर्चना दीपक चौधरी, अंजनाबाई दिलीप पवार यांचा सन्मान करण्यात आला. विद्यमान सरपंच मनोज राधाकिसन कोकाटे यांचाही सन्मान करण्यात आला.
चिचोंडी पाटील ग्रामपंचायतीची स्थापना १३ ऑगस्ट १९४१ रोजी झाली. त्याला आज ऐंशी वर्ष पूर्ण झाले. त्यानिमित्त गावच्या विकासात योगदान देणारे गावचे प्रथम नागरिक तथा सरपंच यांचा सन्मान करून त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने ग्रामपंचायत कार्यालयासमोर हा कार्यक्रम पार पडला.
यावेळी ज्येष्ठ नागरिक श्रीरंग कोकाटे, कामधेनू पतसंस्थेचे अध्यक्ष डॉ. ययाती फिसके, माध्यमिक शिक्षक सोसायटीचे माजी संचालक कल्याण ठोंबरे, ज्येष्ठ शिक्षक नेते आबासाहेब कोकाटे, विविध कार्यकारी सेवा संस्थेचे राजेंद्र कोकाटे यांनी विचार व्यक्त केले. यावेळी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच कल्पना ठोंबरे, ग्रामपंचायत सदस्य अशोक कोकाटे, माजी उपसरपंच शरद पवार, महेश जगताप, पांडुरंग ससे, ग्रा. पं. सदस्य दीपक हजारे, संदीप काळे, यशोदा कोकाटे, सविता खराडे, जयश्री कोकाटे आदी उपस्थित होते.
सूत्रसंचालन मुख्याध्यापक प्रकाश ठोंबरे यांनी केले. सरपंच मनोज कोकाटे यांनी आभार मानले.
~~~~~~~
१४चिचोंडी पाटील
चिचोंडी पाटील ग्रामपंचायतीच्या वर्धापन दिनानिमित्त आजी-माजी सरपंचांचा सन्मान करण्यात आला. (छायाचित्र : संजय ठोंबरे)