तळेगाव दिघे येथे आयोजित कोविड योद्धा सन्मान कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी थोरात साखर कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात होते. प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य महेंद्र गोडगे, प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, तहसीलदार अमोल निकम, उत्तर नगर जिल्हा युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुभाषराव सांगळे, पंचायत समितीच्या सदस्या आशा इल्हे, बेबी थोरात, सरपंच बाबासाहेब कांदळकर, उपसरपंच रमेश दिघे, छत्रपती प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष सचिन दिघे, गणेश दिघे, बाळासाहेब दिघे, संपतराव दिघे, रावसाहेब दिघे, अमोल दिघे, भाऊसाहेब दिघे उपस्थित होते.
याप्रसंगी इंद्रजीत थोरात, प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक जिल्हा परिषद सदस्य महेंद्र गोडगे पाटील यांनी केले. सूत्रसंचालन सचिन दिघे यांनी केले. सरपंच बाबासाहेब कांदळकर यांनी आभार मानले.
रुग्णवाहिकेचे लोकार्पण
जिल्हा परिषदेमार्फत तळेगाव दिघे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास नवीन रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आली. चिंचोली गुरव येथील कार्यक्रमात थोरात साखर कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात व जिल्हा परिषद सदस्य महेंद्र गोडगे पाटील यांच्या हस्ते सदर रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले.