शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णसेवा करणाऱ्या डॉक्टरांचा गौरव

By admin | Updated: July 26, 2016 00:03 IST

अहमदनगर : डॉ.अनभुले हॉस्पिटल, स्टार आय.सी.यू. स्पेशालिटी अ‍ॅण्ड जनरल केअर युनिटच्यावतीने रविवारी मोफत मधुमेह प्रशिक्षण शिबीर झाले.

अहमदनगर : डॉ.अनभुले हॉस्पिटल, स्टार आय.सी.यू. स्पेशालिटी अ‍ॅण्ड जनरल केअर युनिटच्यावतीने रविवारी मोफत मधुमेह प्रशिक्षण शिबीर झाले. यावेळी शहरात २५ वर्षांपेक्षा जास्त काळ रुग्णसेवा देणाऱ्या डॉक्टरांचा गौरव करण्यात आला. या शिबिर उदघाटन कार्यक्रमास माजी मंत्री बबनराव पाचपुते, डॉ.रावसाहेब अनभुले, डॉ.गोपाल बहरुपी, डॉ.सुधीर बोरकर, डॉ. रणजीत सत्रे, डॉ.भूषण अनभुले, डॉ.दीपाली अनभुले, डॉ.योगीता सत्रे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात २५ वर्षांपेक्षा जास्त काळ रुग्णसेवा करणाऱ्या डॉक्टरांचा गौरव करण्यात आला. त्यामध्ये डॉ.संभाजी पानसंबळ, डॉ.शैलेंद्र खंडागळे, डॉ.भाऊदेव जोशी, डॉ.सुमतीलाल संकलेचा, डॉ.उदय महाले, डॉ. विलास सोनवणे, डॉ.एस.जी.खन्ना, डॉ.अजय देशमुख, डॉ.पी.एस.आहुजा, डॉ.प्रदीप काळपुंड, डॉ.विलास कवळे, डॉ.सिमा इकबाल आदींचा समावेश होता.यावेळी पाचपुते म्हणाले, जो संकटाचा सामना करतो तोच यशस्वी होतो. जो दमून जातो तो संपून जातो. आजारापुढे हार न मानता त्याच्याशी सामना करा. काळजी करु नका, तर काळजी घ्या. चिंता करु नका, तर चिंतन करा. मधुमेह टाळण्यासाठी योग्य आहार व व्यायामाची आवश्यकता आहे. आळस झटकून व्यायाम केल्यास आरोग्य उत्तम राहून जीवन आनंदी बनते. डॉ. गोपाळ बहुरुपी म्हणाले, मधुमेह आजार इतर आजारांपेक्षा सर्वात चांगला व सर्वात वाईट आजार आहे. यासाठी त्याची माहिती व जनजागृती होणे आवश्यक आहे. मधुमेहाच्या रुग्णांसाठी सर्वात महत्त्वाचे पथ्य पाळणे आवश्यक आहे. या आजारात डोक्यापासून तर पायाच्या नखा पर्यंत शरीर आतून पोखरले जाते. फास्टफुड, व्यायामाचा अभाव, मानसिक ताण यामुंळे मधुमेहांच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. मधुमेह आजाराकडे दुर्लक्ष केल्यास रुग्णाला एखादा अवयव गमवावा लागतो. उत्तम आहार, तणावमुक्त जीवन व नियमित व्यायाम केल्यास मधुमेह रुग्णांना सामान्यांप्रमाणे आनंदी जीवन जगता येते. डॉ.सुधीर बोरकर यांनी योगा, इन्सुलिनविषयी मार्गदर्शन केले. मधुमेह प्रशिक्षण शिबीरास नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मधुमेह रुग्णांची मोफत तपासणी करुन, गरजू रुग्णांना मोफत औषधांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन शर्मिला गोसावी यांनी केले. उपस्थितांचे आभार संदीप लोखंडे यांनी मानले. (प्रतिनिधी)