शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

घरपोहोच मिळणार किराणा; अहमदनगर महापालिकेचे युध्दपातळीवर नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2020 11:39 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाऊनच्या  काळात नागरिकांना अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तुंची कमतरता पडू नये, यासाठी दुकानदारांमार्फत किराणा घरपोहोच केला जाणार आहे. महापालिकेकडून तसे नियोजन करण्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे.

अहमदनगर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाऊनच्या  काळात नागरिकांना अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तुंची कमतरता पडू नये, यासाठी दुकानदारांमार्फत किराणा घरपोहोच केला जाणार आहे. महापालिकेकडून तसे नियोजन करण्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे.बंद काळात नागरिकांना जीवनावश्यक वस्तू घरपोहोच देण्याची तयारी प्रशासनाकडून सुरू आहे. नगर शहरातील मध्यवर्ती भागात होलसेल विक्रेते आहेत. त्यांना शहर व परिसरातील रिटेलरांना माल पुरविण्यासाठी परवानगी दिली जाणार आहे. महापालिका ही वाहतूक करणा-यांना ओळखपत्र देणार आहे. हे ओळखपत्र असलेले वाहन व व्यक्तीच फक्त रस्त्यावर जाऊ शकतील. रिटेल सोशल मीडियाव्दारे आपली मागणी होलसेलरकडे करतील. त्यानुसार ते रिटेलरचा माल पॅक  करून तो वाहनातून त्यांच्या दुकानापर्यंत पोहोचत करतील. रिटेलर आपल्या भागातील नागरिकांकडून  फोनवर यादी मागवून घेतील. त्यानुसार किराणा नागरिकांच्या घरी पोहोच होईल. किराणा घरपोहोच करणायांनाही महापालिकेकडून ओळखपत्र दिले जाईल. हे ओळखपत्र असणारे किराणा घरी पोहोच करण्याचे काम करतील, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.महापालिकेन चार प्रभाग कार्यालयांना आपल्या भागातील किरणा दुकानदारांची नाव व फोन नंबर, अशी यादी तयार करण्याचा आदेश दिला आहे. ही यादी प्राप्त झाल्यानंतर प्रत्येक प्रभागातील दुकानदारांचे नाव व मोबाईल नंबर सोशल मिडियावर प्रसिध्द करण्यात येईल. ही यादी प्रभाग अधिकारी, नगरसेवक सामाजिक कार्यकर्ते, कर्मचारी सोशल मीडियाव्दारे लोकांपर्यंत पोहोचवतील. त्यानंतर पुढील काळात किराणा घरपोहोच करण्याची सुविधा करण्यात येणार असल्याचे महापालिकेच्या वतीने सांगण्यात आले. 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरcorona virusकोरोना वायरस बातम्याbusinessव्यवसाय