शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

निविदा ठेवा बाजूला.. आधी खड्डे बुजवा

By admin | Updated: July 27, 2016 00:38 IST

अहमदनगर : खड्डे बुजविण्यासाठी फेरनिविदा काढली आहे, असे सांगून वेळ मारून नेऊ नका. खड्डे कसे बुजवायचे, त्याचे नियोजन करा

अहमदनगर : खड्डे बुजविण्यासाठी फेरनिविदा काढली आहे, असे सांगून वेळ मारून नेऊ नका. खड्डे कसे बुजवायचे, त्याचे नियोजन करा. बांधकाम विभागानेच खड्डे बुजविण्याचे काम तत्काळ हाती घ्यावे, असे आदेश उपमहापौर श्रीपाद छिंदम यांनी महापालिकेच्या अभियंत्यांना दिले आहेत.शहरातील खड्ड्यांबाबत सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर उपमहापौरांनी मंगळवारी सायंकाळी महापालिकेच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. निविदा, फेरनिविदा, ठेकेदाराचा नकार, वाढीव दर आदी कारणे अधिकाऱ्यांकडून सांगितली जात आहेत. नागरिकांना कारणे सांगण्यासाठी आम्ही येथे बसलेलो नाहीत. कोणत्याही परिस्थितीत खड्डे बुजविण्याचे काम तत्काळ हाती घ्यावे, अशा शब्दात छिंदम यांनी महापालिकेच्या कारभाराचा समाचार घेतला. शहरातील अनेक रस्त्यांवर पथदिवे बंद आहेत. दोन- तीन महिन्यांपासून विद्युत साहित्य उपलब्ध नाही. त्यामुळे विद्युत दुरुस्तीची कामे बंद आहेत. रस्त्यावर अंधार असल्याने नागरिक भयभीत आहेत. याचाही विचार करा, असे छिंदम यांनी सांगितले. मात्र विद्युत पुरवठादारांची देणी थकली असल्याने त्यांनी साहित्याचा पुरवठा बंद केला आहे, असे अधिकाऱ्यांनी बैठकीत सांगितले. त्यामुळे शहरात दिवे बसविण्याची मागणी पूर्ण करण्यात अडथळे येत आहेत.यावेळी उपमहापौर म्हणाले, शहरातील रस्त्यांच्या पॅचिंगच्या कामासाठी मागविलेल्या फेरनिविदेस विलंब लागणार आहे. त्यामुळे बांधकाम विभागानेच खड्डे बुजविण्याचे काम हाती घ्यावे. ज्या ठेकेदाराने रस्त्याचे काम केले, त्याच ठेकेदाराला रस्त्याच्या पॅचिंगचे काम दिले तर काम अधिक चांगले होईल. विद्युत पुरवठादाराला दरमहा ठरावीक रक्कम दिली तर कामे सुरू राहतील, अशी सूचना छिंदम यांनी मांडली. या बैठकीला उपायुक्त भालचंद्र बेहरे, शहर अभियंता विलास सोनटक्के, मुख्य लेखा परीक्षक अनारसे, मुख्यलेखाधिकारी राजेंद्र झिरपे, आर. जी. सातपुते, प्रभाग अभियंता मनोज पारखे, श्रीकांत निंबाळकर, बाळासाहेब सावळे आदी उपस्थित होते. दोन दिवसांनी छिंदम पुन्हा आढावा घेणार आहेत. (प्रतिनिधी)