शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

हिंगणी बंधा-यात दोघांना जलसमाधी; दोघे बचावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 15:26 IST

कोपरगाव : पोहण्यासाठी हिंगणी बंधा-यावर गेलेल्या शहरातील दोन महाविद्यालयीन युवकांचा पाण्यात बुडून मृत्यु झाल्याची घटना शनिवारी सकाळी अकरा वाजता ...

ठळक मुद्देमृतांमध्ये एक कोपरगावचा तर दुसरा गंगापूर (औरंगाबद) येथील रहिवासी आहे.चिखलात पाय रुतल्याने दोघेही बंधा-यात बुडालेदोघेही बारावीच्या वर्गात शिक्षण घेत होते.

कोपरगाव : पोहण्यासाठी हिंगणी बंधा-यावर गेलेल्या शहरातील दोन महाविद्यालयीन युवकांचा पाण्यात बुडून मृत्यु झाल्याची घटना शनिवारी सकाळी अकरा वाजता घडली. यातील अन्य दोघे मित्र बचावले आहेत. याप्रकरणी तालुका पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.शहरातील एका महाविद्यालयात इयत्ता बारावीच्या वर्गात शिक्षण घेत असलेले सार्थक किशोर सोनवणे (वय १७, रा. निवारा हौसिंग सोसायटी), सार्थक उर्फ साईनाथ संतोष लांडे (वय १७, रा. लक्ष्मीनगर), ऋषीकेश अंकुश आगलावे (रा. लक्ष्मीनगर) व अक्षय नामदेव चौधरी (रा. धारणगाव) हे चौघे मित्र शनिवारी (दि़ १६) सकाळी अकरा वाजता गोदावरी नदीवरील हिंगणी बंधा-यात पोहण्यासाठी गेले होते. हिंगणीच्या वाड्यापासून ते नदीत उतरले. दरम्यान पोहत असताना सार्थक सोनवणे व सार्थक लांडे यांचे गाळामध्ये पाय रूतल्याने त्यांना हालचाल करणे अशक्य झाले. त्यामुळे दोघांचा पाण्यात बुडून श्वास गुदमरून मृत्यु झाला. मयत सार्थक उर्फ साईनाथ लांडे हा मूळ माहूली (ता. गंगापूर, जि.औरंगाबाद) येथील असून तो येथे मामाकडे शिक्षणासाठी राहत होता.उर्वरीत दोघा मित्रांनी प्रसंगावधान राखल्याने ते बचावले. याप्रकरणी हिंगणीचे पोलीस पाटील पंडीत पवार यांनी तालुका पोलिसांना खबर दिली. त्यावरून पोलीस निरीक्षक साहेबराव कडनोर, हेड कॉन्स्टेबल एकनाथ बच्छे, अर्जुन बाबर व अमित खोकले यांनी घटनास्थळी जावून राजेंद्र चंदनशिव यांच्या मदतीने दोघांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढले. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी मृतदेह ग्रामीण रूग्णालयात नेले. सदर घटनेप्रकरणी तालुका पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.