शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

अपहृत तरुणाचा खून की आत्महत्या?

By admin | Updated: June 29, 2016 00:52 IST

टाकळी ढोकेश्वर : पारनेर तालुक्यातील खडकवाडी येथील संतोष साहेबराव ढोकळे (वय ३१) या विवाहित तरुणाचे रविवारी अपहरण झाल्यानंतर त्याचा मृतदेह मंगळवारी संशयास्पद अवस्थेत सापडला.

टाकळी ढोकेश्वर : पारनेर तालुक्यातील खडकवाडी येथील संतोष साहेबराव ढोकळे (वय ३१) या विवाहित तरुणाचे रविवारी अपहरण झाल्यानंतर त्याचा मृतदेह मंगळवारी संशयास्पद अवस्थेत सापडला. याबाबत यशवंत भाऊसाहेब हुलवळे (वय ३५, रा. खडकवाडी, ता. पारनेर) यांच्या फिर्यादीवरून पारनेर पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा नोंदविण्यात आला. दरम्यान, याप्रकरणी पोपट तुकाराम ढोले या संशयितास पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. बहिणीची छेडछाड करून तिचा पाठलाग केल्याच्या कारणावरुन मृत संतोषला रविवारी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास सीमा राजेंद्र आमले (रा. आमलेवाडी, सावरगाव घुले, ता. संगमनेर), पोपट जयराम ढोले (रा. येणेरे, ता. जुन्नर, जि. पुणे) यांनी आम्हाला कोंबड्या घ्यायच्या आहेत, असे कारण सांगून त्यास पोल्ट्री फार्मवर नेऊन बळजबरीने चारचाकी वाहनात बसवून त्याचे अपहरण केल्याचे हुलावळे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. मंगळवारी साकूर घारगाव रस्त्यावरील जांबूत घाटाजवळ नांदूर खंदरमाळ (ता.संगमनेर) शिवारात राधाबाई बाबुराव भागवत यांच्या शेतात मंगळवारी सकाळी ७ च्या सुमारास लिंबाच्या झाडाला गळफास घेतलेली अनोळखी व्यक्ती दिसल्याची माहिती नांदूर खंदरमाळचे पोलीस पाटील किसन पंढरीनाथ सुपेकर यांनी घारगाव पोलीस ठाण्यास खबर दिली. त्यानुसार घारगावचे पोलीस निरीक्षक दिलीप निघोट यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तेव्हा लिंबाच्या झाडाला फेट्याने गळफास घेतलेला मृत तरुण दिसला. त्याच्या छाती, पाठ, हात व गळ्यावर धारदार शस्त्रासह इतर वस्तूने मारलेल्या जखमा दिसल्या. गळफास घेतल्यामुळे याप्रकरणी अकस्मात मृत्युची नोंद केल्याचे निघोट यांनी सांगितले. या मृतदेहाची शहानिशा करण्यासाठी पारनेर पोलीस ठाण्याशी संपर्क साधल्यानंतर हा मृतदेह खडकवाडीच्या संतोषचाच असल्याचे उघड झाले. (वार्ताहर) सध्या पोलिसांनी अकस्मात मृत्युची नोंद केली असली तरी हा खून की आत्महत्या, याचे गूढ निर्माण झाले आहे. संगमनेरच्या रुग्णालयात उत्तरीय तपासणी केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. टाकळी ढोकेश्वर पोलीस ठाण्याचे फौजदार घुगे, सहायक फौजदार माळवदे तपास करीत आहेत.