येथील इंडियन ऑईल डेपो येथे केडगाव पोलीस मदत केंद्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शशिकांत गिरी तसेच नगर तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर सिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली इंडियन ऑइल डेपोतील वाहनचालकांना वाहतुकीचे नियम, अपघाताची कारणे, वेगमर्यादा याबाबत मार्गदर्शन करून प्रबोधन केले. अभियान
अप्पर पोलीस महासंचालक वाहतूक महाराष्ट्र राज्य भूषणकुमार उपाध्याय, पोलीस अधीक्षक महामार्ग पुणे विभागाचे संजय जाधव, पोलीस उपअधीक्षक प्रीतम यावलकर, पोलीस निरीक्षक नंदिनी चानपूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली राबण्यात येत असल्याची माहिती गिरी यांनी दिली.
यावेळी प्रमुख पाहुणे व ऊद्घाटक म्हणुन वरिष्ठ डिपो प्रबंधक, आर निलकंठन, मुख्य प्रबंधक परियोजना शशांक जाधव, प्रसाद गावडे यांच्यासह डेपोतील वाहनचालक, केडगाव मदत केंद्राचे पोलीस कर्मचारी उपस्थित होते.